Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी CWC : काँग्रेस वर्किंग कमिटीची घोषणा; अशोक चव्हाण, प्रणिती शिंदेंसह महाराष्ट्रातील 'या'...

CWC : काँग्रेस वर्किंग कमिटीची घोषणा; अशोक चव्हाण, प्रणिती शिंदेंसह महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांचा समावेश

Subscribe

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी काँग्रेस वर्किंग कमिटीची घोषणा केली आहे. काँग्रेसच्या  39 वरिष्ठ नेत्यांना यात स्थान देण्यात आले आहे. यात सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, शशि थरुर यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील मुकुल वासिनक, अशोक चव्हाण यांचाही वर्किंग कमिटीत समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खर्गेंविरुद्ध शशि थरुर मैदानात उतरले होते, तेही या समितीमध्ये काम करणार आहेत.

काँग्रेस अध्यक्ष खर्गेंनी रविवारी जाहीर केलेल्या यादीत आगामी विधानसभा निवडणूक असलेल्या राजस्थानमधून सचिन पायलट, मध्यप्रदेशमधून कमलेश्वर पटेल आणि छत्तीसगडमधील ताम्रध्वज साहू यांनाही समितीत स्थान दिले आहे. एकूण 84 सदस्यांची ही समिती आहे. यात काँग्रेस वर्किंग कमिटी मेंबर, स्थायी आमंत्रित, महासचिव, विशेष आमंत्रित आणि प्रभारी अशी विभागणी करण्यात आली आहे.

मल्लिकार्जुन खरगेंच्या टीममध्ये महाराष्ट्र

- Advertisement -

काँग्रेस वर्किंग कमिटी
अशोक चव्हाण

स्थायी आमंत्रित
चंद्रकांत हंडोरे

- Advertisement -

प्रभारी
माणिकराव ठाकरे
रजनी पटेल

विशेष आमंत्रित
यशोमती ठाकूर
प्रणिती शिंदे

काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये महाराष्ट्रातील नेते
काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये महाराष्ट्रातील नेते

 • काँग्रेस कार्यालयाने रविवारी वर्किंग कमिटीची यादी जाहीर केली आहे. यामध्ये राजस्थानचे सचिन पायलट यांनाही वर्किंग कमिटीमध्ये सदस्यपद देण्यात आले आहे.
 • काँग्रेस वर्किंग कमिटी
  १. मल्लिकार्जुन खर्गे
  २. सोनिया गांधी
  ३. मनमोहन सिंह
  ४. राहुल गांधी,
  ५. अधीर रंजन चौधरी
  ६. ए. के. अँटोनी
  ७. अंबिका सोनी
  ८. मीरा कुमार
  ९. दिग्विजय सिंह
  १०. पी. चिदंबरम
  ११. तारिक अन्वर
  १२. लाल थानावाला
  १३. मुकुल वासनिक
  १४. आनंद शर्मा
  १५. अशोक चव्हाण
  १६. अजय माकन
  १७. चरणजीतसिंग चन्नी
  १८. प्रियंका गांधी
  १९. कुमारी शैलजा
  २०. गायखंगम
  २१. एन. रघुवीर रेड्डी
  २२. शशि थरुर
  २३. ताम्रध्वज साहू
  २४. अभिषेक मनु संघवी
  २५. सलमान खुर्शिद
  २६. जयराम रमेश
  २७. जितेंद्र सिंह
  २८. रणदीप सिंह सूरजेवाला
  २९. सचिन पायलट
  ३०. दिपक बाबरिया
  ३१. जगदीश ठाकोर
  ३२. जी. ए. मिर
  ३३. अवनिश पांडे
  ३४. दीपा दास मुन्शी
  ३५. महेंद्रजितसिंह मालविय
  ३६. गौरव गोगोई
  ३७. सय्यद नासिर हुसैन
  ३८. कमलेश्वर पटेल
  ३९. के. सी. वेणूगोपाल
 • स्थायी आमंत्रितांच्या यादीत महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांच्यासह 18 सदस्यांना स्थान देण्यात आले आहे.
 • स्थायी आमंत्रित 18

१. विरप्पा मोईली
२. हरिश रावत
३. पवनकुमार बंसल
४. मोहन प्रकाश
५. रमेश चेन्नीथला
६. बी. के. हरिप्रसाद
७. प्रतिभा सिंह
८. मनिष तिवारी
९. तारिक हमिद केरा
१०. दिपेंद्र सिंह हुड्डा
११. गिरीश राय चोदनकर
१२. टी. सुब्बारमी रेड्डी
१३. के. राजू
१४. चंद्रकांत हंडोरे
१५. मिनाक्षी नटराजन
१६. फुलो देवी नेतम
१७. दामोदर राजा नरसिम्हा
१८. सुदीप रॉय बर्मन

 • प्रभारींमध्ये महाराष्ट्राचे माणिकराव ठाकरे आणि रजनी पटेल यांच्यासह १४ जणांचा समावेश आहे.

प्रभारी 14

१९. डॉ. ए. चेल्लाकुमार
२०. भक्त चरण दास
२१. डॉ. अजय कुमार
२२. हरिष चौधरी
२३. राजीव शुक्ला
२४. मणिकांचम टागोर
२५. सुखविंदर रंधावा
२६. माणिकराव ठाकरे
२७. रजनी पटेल
२८. कन्हय्या कुमार
२९. गौरदिप सप्पल
३०. सचिन राव
३१. देवेंद्र यादव
३२. मनिष चतरथ

 • विशेष आमंत्रित सदस्यांमध्ये सध्याच्या काँग्रेसच्या फायर ब्रँड प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत आणि महाराष्ट्रातून प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर यांच्यासह आठ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.

विशेष आमंत्रित 9

१. पल्लम राजू
२. पवन खेडा
३. गणेश गोडियाल
४. कोडिकोनूल सुरेश
५. यशोमती ठाकूर
६. सुप्रिया श्रीनेत
७. प्रणिती शिंदे
८. अलका लांबा
९. वामशी चंद रेड्डी

माजी पदाधिकारी – 4 
१०. श्रीनिवास बी. व्ही – युवक काँग्रेस, अध्यक्ष
११. निरज कुंदन – एनएसयूआय, अध्यक्ष
१२. निता डि’सुझा – महिला काँग्रेस, अध्यक्ष
१३. लालजी देसाई – सेवादल, मुख्य संयोजक
एकूण  84

 

- Advertisment -