घरट्रेंडिंगराहुल गांधींचा मनोरंजनात्मक व्हिडिओ!

राहुल गांधींचा मनोरंजनात्मक व्हिडिओ!

Subscribe

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा टीका केली आहे, मात्र, यावेळी जरा हटके पद्धतीने आणि बोचरी टीका केली आहे.

भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही देशातले प्रमुख राष्ट्रीय पक्ष. त्यामुळे देशात लोकसभा निवडणुका होऊ घातल्या असताना या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीका करण्याची, एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढण्याची एकही संधी सोडली जात नाहीये. आणि या आरोप-प्रत्यारोपांच्या स्पर्धेमध्ये स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या बाजूने तर पक्षाध्यक्ष राहुल गांधी काँग्रेसच्या बाजूने मैदानात आहेत. यातच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर वारंवार एकच गोष्ट बोलत राहायची टीका केली होती. मोदी-शहा जोडीवर राहुल गांधींनी वारंवार चालवलेल्या टिकेच्या पार्श्वभीमीवर मोदींनी ही टीका केली होती. आता यालाच राहुल गांधींनी उत्तर दिलं आहे. पण नेहमीप्रमाणे सभेत, मंचावरून किंवा भाषणातून नाही तर एका व्हिडिओच्या माध्यमातून!


तुम्हाला हे माहिती आहे का? – ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी पार्टटाईम जॉब करतायत!’

आणि मोदी म्हणतात ‘गांधी-गांधी’!

राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाच्या विविध व्हिडिओंमधल्या काही क्लिप एकत्र करून त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे. मात्र, या व्हिडिओची खास गोष्ट म्हणजे यात मोदींच्या तोंडी फक्त गांधी, इंदिरा गांधी, सोनिया गांधी, जवाहरलाल नेहरू हेच शब्द आहेत. मोदींच्या प्रत्येक भाषणातले हे शब्द एकत्र करून हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. आणि व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

राहुल गांधी म्हणतात…

हा मनोरंजनात्मक व्हिडिओ ‘श्री ३६’ने सादर केला आहे. मला अशी आशा आहे की हा व्हिडिओ पाहून तुम्हाला मजा येईल! कृपया हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील शेअर करा. जेणेकरून ते देखील या व्हिडिओची मजा घेऊ शकतील!

- Advertisement -

आता राहुल गांधींनी उडवलेला हा बार भाजपच्या किती जिव्हारी लागतो? आणि ते याचं किती लवकर आणि कसं उत्तर देतात? हे पाहाण्याची उत्सुकता त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांपेक्षाही नेटिझन्सला जास्त लागली आहे.


वाचा कोण म्हणतंय असं – ‘नरेंद्र मोदी नालायक, भिकार माणूस’
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -