राहुल गांधींनी ईडी चौकशीदरम्यान बदलली अनेक प्रश्नांची उत्तरं, आज पुन्हा चौकशीला राहणार हजर

ध्ये तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. चौकशी सुरु होण्यापूर्वी राहुल गांधी यांना सर्व प्रश्नांची उत्तरे योग्य आणि खरी देईल अशी शपथ देण्यात आली आहे.

Rahul Gandhi changed the answers to many questions during the ED interrogation
राहुल गांधींनी ईडी चौकशीदरम्यान बदलली अनेक प्रश्नांची उत्तरं, आज पुन्हा चौकशीला राहणार हजर

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीला हजेरी लावली होती. ईडी कार्यालयात राहुल गांधी यांची चौकशी करण्यात आली. साडे आठ तासांच्या चौकशीनंतर राहुल गांधी यांना सोडण्यात आले. दरम्यान आज पुन्हा त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीदरम्यान राहुल गांधी यांनी अनेक प्रश्नांचे उत्तरं बदलली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर पुन्हा राहुल गांधी यांनी उत्तरांमध्ये बदल केले असल्याचे सांगण्यात येत आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना ईडीने पुन्हा ११ वाजता चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राहुल गांधी यांच्यासमोर अनेक पुरावे आणि कागदपत्रे ठेवण्यात येतील ज्यावर त्यांना उत्तर देणं अपेक्षित आहे. राहुल गांधींचा जवाब पीएमएलए अॅक्ट सेक्शन ५० अंतर्गत नोंदवण्यात आणि रेकॉर्ड करण्यात येत आहे. चौकशी करणाऱ्या टीममध्ये तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. चौकशी सुरु होण्यापूर्वी राहुल गांधी यांना सर्व प्रश्नांची उत्तरे योग्य आणि खरी देईल अशी शपथ देण्यात आली आहे.

राहुल गांधींना ईडीने कोणते प्रश्न विचारले?

राहुल गांधींना ईडीने अनेक प्रश्न विचारले. पहिल्या फेरीत कागदपत्रांच्या आधारावर राहुल गांधींना काही प्रश्न विचारण्यात आले. तर काही प्रश्न हे व्यवहारावरुन विचारण्यात आले होते. या प्रश्नांबाबत आपल्याला काही माहिती आहे का? असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आला होता. दुसऱ्या फेरीमध्ये राहुल गांधींना कोलकातामधील बोगस ठरवलेल्या कंपनीबाबत प्रश्न विचारण्यात आले. याच कंपनीमधून ५० लाख रुपये देण्यात आले. तसेच राहुल आणि सोनिया गांधी दोघांना ३८ टक्के शेअर मिळाले. तसेच इतर कंपन्यांकडून झालेल्या देवाण-घेवाणबाबत ईडीने प्रश्न विचारले होते. राहुल गांधींच्या उत्तरांवर ईडी समाधानकारक नाही. यामुळे राहुल गांधी पुन्हा चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे.

चौकशीदरम्यान राहुल गांधींना लंच ब्रेक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सोमवारी ईडी चौकशी झाली. या चौकशीमध्ये त्यांना जेवणासाठी सुट्टी देण्यात आली होती. जेवणानंतर त्यांना पुन्हा ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. यानुसार राहुल गांधी पुन्हा चौकशीला हजर राहिले होते.


हेही वाचा : एकनाथ खडसे, सचिन अहिर डेंजर झोनमध्ये?