घरदेश-विदेशराहुल गांधींची ट्रक चालकांसोबत 'मन की बात', जाणून घेतल्या समस्या; पाहा फोटो

राहुल गांधींची ट्रक चालकांसोबत ‘मन की बात’, जाणून घेतल्या समस्या; पाहा फोटो

Subscribe

राहुल गांधींचा ट्रक चालवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. ट्रक चालकांच्या समस्या समजून घेण्यासाठी राहुल गांधी यांनी ट्रक चालकांसोबत प्रवास केल्याचे युवक काँग्रेसने म्हटले आहे. यावेळी त्यांनी ट्रक चालकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले की, जननायक राहुल गांधी ट्रक चालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचले. ( Congress Rahul Gandhis Mann Ki Baat with truck drivers known problems See photo )

मंगळवारी सकाळी काँग्रेस नेते राहुल गांधी वेगळ्याच अंदाजात दिसले. राहुल गांधी ट्रकने दिल्लीहून रस्त्याने अंबाला येथे पोहोचले आणि त्यानंतर ते एका गुरुद्वारामध्येही गेले, नंतर ते अंबालाहून शिमल्याला रवाना झाले.

- Advertisement -

काँग्रेस नेते राहुल गांधी हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे पोहोचले आहेत. ही त्यांची वैयक्तिक भेट आहे. येथे ते त्यांची बहीण प्रियांका गांधी वाड्रा यांच्या घरी मुक्कामी आहेत. प्रियांका गांधी यांनी शिमलामधील छाराबरा येथे घर बांधले आहे.

काँग्रेसने आपल्या फेसबूक आणि ट्विटर अकाउंटवर राहुल गांधींचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, राहुल गांधी ट्रक चालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पोहोचले आणि त्यांच्यासोबत दिल्ली ते चंदिगड असा प्रवास केला.

- Advertisement -

( हेही वाचा: लोकशाहीचा जय झाल्याचे मोदी सरकारला आवडले नाही अन्…, ठाकरे गटाचा हल्लाबोल )

सध्या राहुल गांधी शिमला येथे त्यांची बहीण प्रियंका गांधी यांच्या घरी पोहोचले आहेत. हिमाचलमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर काँग्रेसने आता जुनी पेंशन योजना (OPS)बहाल केले आहे. त्यामुळे आता राज्यातील कर्मचाऱ्यांनी धर्मशाळेत कृतज्ञता रॅलीचे आयोजन केले असून त्यात मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्खू सहभागी होणार आहेत. या रॅलीत राहुल गांधीही सहभागी होऊ शकतात, अशी चर्चा आहे.

नवीन संसदेचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करा

राहुल गांधी यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, पंतप्रधानांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करु नये, राष्ट्रपतींच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा व्हावा, असं म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -