घरदेश-विदेशबंद दाराआड पवार-शहा-पटेल बैठक, नेमकं काय घडलं हे देशाला सांगा; काँग्रेसचा सवाल

बंद दाराआड पवार-शहा-पटेल बैठक, नेमकं काय घडलं हे देशाला सांगा; काँग्रेसचा सवाल

Subscribe

गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ उडाली. याचदरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात अहमदाबाद येथे गुप्त बैठक देखील पार पडली. एकीकडे या गुप्त बैठकीचं वृत्त राष्ट्रवादी कॉंग्रेस नाकारत आहे, तर दुसरीकडे कॉंग्रेस नेत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या बैठकीबद्दल कॉंग्रेसने असे म्हटले, गृहमंत्री जर देशातील कोणत्याही मोठ्या नेत्याला भेटत असतील तर त्यांनी या देशाला ते सांगायला हवे. यासह देशातील लोकांना ते जाणून घेण्याचा अधिकार देखील असल्याते त्यांनी म्हटले आहे.

असा केला काँग्रेसने केला सवाल

“गृहमंत्री कोणत्याही बड्या नेत्याला भेटतात तेव्हा या बड्या नेत्यांमध्ये काय घडले? काय बोलणे झाले? हे जाणून घेण्याचा देशाला पूर्णपणे हक्क आहे.” असा सवाल कॉंग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी या गोपनीय बैठकीबद्दल केला आहे.

- Advertisement -

एनसीपीचा भाजपावर निशाणा

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी गुप्त बैठकीबद्दल सांगितले की, “गुजरातमधील एका वृत्तपत्राने प्रकाशित केले की, शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल यांनी अमित शहा यांची भेट घेतली. गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर अशा अफवा देखील चर्चेचा विषय ठरत आहेत. अशी कोणतीही बैठक अद्याप दोघांमध्ये झाली नाही.”, असेही त्यांनी सांगितले. भेटीच्या बातमीला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करताना नवाब मलिक यांनीही भाजपवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, भाजप बैठकीबद्दल अफवा पसरवत आहे. ते म्हणाले की, या दोघांमध्ये कोणतीही बैठक झाली नाही. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल थेट जयपूर येथून मुंबईत आले होते.

तर अमित शहा यांनी शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना भेटीच्या प्रश्नावर प्रतित्युत्तर देखील दिले, ते म्हणाले, “सर्व काही सार्वजनिक केले जाऊ शकत नाही.” (सविस्तर वाचा)


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -