घरदेश-विदेशCongress : प्राप्तिकर विभागाकडून काँग्रेसला दिलासा; निवडणुकीपर्यंत कोणतीही कारवाई नाही

Congress : प्राप्तिकर विभागाकडून काँग्रेसला दिलासा; निवडणुकीपर्यंत कोणतीही कारवाई नाही

Subscribe

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका होईपर्यंत काँग्रेसकडून सुमारे 3,500 कोटींच्या दंडाची वसुली केली जाणार नाही, असे आश्वासन प्राप्तिकर विभागाने सोमवारी सर्वोच्च न्यायालयाला दिले. तर त्याचवेळी प्राप्तिकर विभागाने जूनमध्ये सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. (Congress Relief to Congress from Income Tax Department; No action till election)

हेही वाचा – Maharashtra Sadan scam : भुजबळ पुन्हा अडचणीत; उच्च न्यायालयाने बजावली नोटीस

- Advertisement -

2014-15 ते 2016-17 या तीन आर्थिक वर्षांतील करविषयक अनियमिततेसंदर्भात प्राप्तिकर विभागाने काँग्रेसला नवी नोटीस बजावली असून 1 हजार 745 कोटींचा दंड भरण्याचा आदेश दिला आहे. 1994-95, तसेच 2017-18 ते 2020-21 या कालावधीतील मूल्यांकन वर्षांसाठीही काँग्रेसला नोटीस बजाविण्यात आली असून दंडाची एकूण रक्कम, ३3हजार 567 कोटी रुपये भरण्याचा आदेश प्राप्तिकर विभागाने दिला होता. याविरोधात काँग्रेसने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. बी. व्ही. नागरत्न व न्या. ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

प्राप्तिकर विभागाच्यावतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितले की, प्राप्तिकर विभाग लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसविरोधात कोणतीही कठोर कारवाई करणार नाही. निवडणुकीच्या काळात आम्हाला कोणत्याही पक्षाचा त्रास वाढवायचा नाही, असेही विभागाने म्हटले आहे. तसेच या प्रकरणाची सुनावणी जूनपर्यंत पुढे ढकलण्याची विनंतीही प्राप्तिकर विभागाने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. आयकर विभागाच्या या भूमिकेवर काँग्रेसचे वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, आयकर विभागाने मोठी उदारता दाखवली आहे. मी नि:शब्द आहे. कारण हे फार क्वचितच घडते, असा टोला मनू सिंघवी यांनी लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Ambulance Tender Case : रोहित पवारांचे आरोप बिनबुडाचे; आरोग्य विभागाकडूनच खुलासा

दरम्यान, 2017-18 च्या प्रकरणामध्ये प्राप्तिकर विभागाने काँग्रेसची 4 बँकांमधील 11 खाती गोठवली होती. तसेच प्राप्तिकर विभागाने यापूर्वीच काँग्रेसची बँक खाती गोठवून 135 कोटी रुपये जमा करून घेतले आहेत. प्राप्तिकर विभागाच्या या कारवाईनंतर ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात खर्चासाठी पैसे उपलब्ध नसल्याचा दावा काँग्रेसने केला होता. तसेच काँग्रेसची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी केला होता. मात्र आता प्राप्तिकर विभागाने न्यायालयात दिलेल्या आश्वासनामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -