घरदेश-विदेशअग्निपथ योजनेविरोधात काँग्रेसचा जंतरमंतरवर सत्याग्रह, योजना मागे घेण्याची मागणी

अग्निपथ योजनेविरोधात काँग्रेसचा जंतरमंतरवर सत्याग्रह, योजना मागे घेण्याची मागणी

Subscribe

नवीन लष्करी भरती योजनेच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर विरोध होत असताना, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राहुल म्हणाले, त्यांनी वारंवार नोकऱ्यांची खोटी आशा देऊन तरुणांना बेरोजगारीच्या 'अग्नीपाथ'वर चालण्यास भाग पाडले.

केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची (Agneepath Plan) घोषणा केल्यापासून त्याविरोधात देशात हिंसक निदर्शने पाहायला मिळत आहेत. तर यावरून आता राजकारणही होत आहे. काँग्रेसने (Congress) रविवारी जंतरमंतरवर (Jantar Mantar) सत्याग्रह करून या योजनेचा निषेध केला आहे. यावेळी प्रियांका गांधी वढेरा, सचिन पायलट, दिग्विजय सिंग, सलमान खुर्शीद, अजय माकन, जयराम रमेश, अधीर रंजन चौधरी, हरीश रावत, राजीव शुक्ला, प्रमोद तिवारी, पीएल पुनिया, केसी वेणुगोपाल, गौरव गोगोई, दीपेंद्र हुडा आणि काँग्रेसचे इतर मोठे चेहरे सहभागी झाले होते. अग्निपथ योजनेने देशातील तरुणांना रस्त्यावर उतरवल्यामुळेच पक्षाने सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेसने या तरुणांच्या पाठीशी उभे राहण्याची जबाबदारी असल्याचे सांगितले.

नवीन लष्करी भरती योजनेच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर विरोध होत असताना, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राहुल म्हणाले, त्यांनी वारंवार नोकऱ्यांची खोटी आशा देऊन तरुणांना बेरोजगारीच्या ‘अग्नीपाथ’वर चालण्यास भाग पाडले. आठ वर्षात 16 कोटी नोकऱ्या द्यायला हव्या होत्या, मात्र तरुणांनाच ‘पकोडे तळण्याचे’ ज्ञान दिले जात असल्याचेही ते म्हणाले. सचिन पायलट म्हणाले, केंद्रातील विद्यमान सरकार कोणाचेही ऐकत नाही आणि लोकांवर योजना लादते हे पुन्हा सिद्ध झाले आहे. आम्ही आंदोलक तरुणांना हिंसक होऊ नका अशी विनंती करतो. हिंसा हे कशाचेही उत्तर नाही.

- Advertisement -

अग्निपथ योजनेच्या विरोधात जंतर-मंतरवर जमलेले काँग्रेसचे राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढ़ी म्हणाले की, देश जळत आहे आणि पंतप्रधानांनी या योजनेची प्रशंसा करण्यासाठी त्यांच्या पीआर टीमला गुंतवले आहे. सरकारने ही योजना मागे घ्यावी. योजनेला अग्निचे नाव का देण्यात आले? पंतप्रधानांनी पुढे येऊन उत्तर द्यावे. सत्याग्रहाचा अर्थ बदलत नाही, असे काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी म्हटले आहे. जेव्हा तुम्ही सत्याच्या बाजूने उभे राहाल तेव्हा प्रामाणिक मनाने करा, त्यालाच सत्याग्रह म्हणतील. सत्याग्रहाचा संबंध लोकशाहीशी आहे. सत्यमेव जयते!

अमित मालवीयांच्या आरोपावर सलमान खुर्शीद म्हणाले की, अमित मालवीय यांना फोन करा, बघा इथे हिंसाचार होतोय? सत्याग्रहाला घाबरू नये. याशिवाय झारखंडच्या आमदार ‘देश रक्ताने भिजणार’ या विधानावर प्रतिक्रिया देताना खुर्शीद म्हणाले की, ही त्यांची भाषा आहे, मला माझ्या भाषेबद्दल विचारा, मी त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करू शकत नाही.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -