घरदेश-विदेश"काँग्रेसने जास्त खूश होऊ नये...", रणनितीकार प्रशांत किशोर यांनी का दिला असा...

“काँग्रेसने जास्त खूश होऊ नये…”, रणनितीकार प्रशांत किशोर यांनी का दिला असा सल्ला?

Subscribe

कर्नाटकातील विजयानंतर आनंदी होणाऱ्या काँग्रेसला राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर शांत व्हावे लागणार आहे. कारण प्रशांत किशोर यांनी दिलेला सल्ला हा काँग्रेसच्या आनंदावर आणि जल्लोषावर विरझन पाडण्यासारखा आहे.

काँग्रेस पक्षाला कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये दणदणीत विजय (Karnataka assembly election result) मिळाला आहे. त्यामुळे सध्या पक्षातील नेते आणि पदाधिकारी हे आजही या विजयाचा जल्लोष करत आहेत. ही निवडणुक जिंकण्याच्या आनंदापेक्षा कर्नाटकात भाजपचा केलेला पराभव हाच काँग्रेसला आनंद साजरा करण्यासाठी महत्त्वाचे कारण असल्याचे बोलले जात आहे. पण या विजयानंतर आनंदी होणाऱ्या काँग्रेसला मात्र राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर शांत व्हावे लागणार आहे. कारण प्रशांत किशोर यांनी दिलेला सल्ला हा काँग्रेसच्या आनंदावर आणि जल्लोषावर विरझन पाडण्यासारखा आहे. (“Congress should not get too complacent…”, why did strategist Prashant Kishor advise?)

प्रशांत किशोर यांनी काय दिलाय सल्ला?
प्रशांत किशोर हे राजकीय रणनितीकार म्हणून देशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे राजकीय घटनांबाबतचे गणित ते अचूक पद्धतीने बांधतात. पण त्यांनी काँग्रेसला दिलेला सल्ला हा विचार करायला लावणार आहे. “कर्नाटकच्या विजयानं काँग्रेसनं जास्त खूश होऊ नये कारण 2013 मध्येही कर्नाटक निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर लोकसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसचा पराभव झाला होता,” असा सल्ला देत प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला त्यांच्या पराभवाची आठवण करून दिली आहे. त्यामुळे काँग्रेसचा आनंद हा फार काळ टिकणारा नाही, असा इशारा तर त्यांना त्यांच्या सल्ल्यातून द्यायचा नाही, ना. असेही मत आता व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

प्रशांत किशोर यांची ‘जन सूरज यात्रा’ पुन्हा सुरू होणार
प्रशांत किशोर यांना दुखापत झाली आहे. त्यामुळे ते बिहारमधील त्यांच्या ‘जन सूरज’ पदयात्रेला गैरहजर राहणार आहे. जवळपास महिनाभर ते यात्रेत सहभागी होऊ शकणार नाहीत. याबाबतची माहिती त्यांनी समस्तीपूरमध्ये प्रसारमाध्यमांना दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “गांधी जयंतीला सुरू झालेली पदयात्रा आता सुमारे 15 दिवसांनी पुन्हा सुरू होऊ शकते. पण प्रकृती अस्वास्थामुळे यात्रेपासून मी दूर राहणार आहे.”

कर्नाटकात मुख्यमंत्री म्हणून या’ नावाची घोषणा होण्याची शक्यता..
कर्नाटकात मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, जितेंद्र सिंह आणि दीपक बाबरिया यांची निरीक्षक म्हणून निवड केली होती. या तिन्ही पर्यवेक्षकांना रविवारी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांशी स्वतंत्रपणे बोलून त्यांचे मत जाणून घ्यायचे होते. आमदारांची मतं जाणून घेण्यासाठी गुप्त मतदानही करण्यात आले आहे. हे तिन्ही निरीक्षक सोमवारी सायंकाळी खर्गे यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी याबाबतचा अहवात खर्गे यांना दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर बहुतांश नवनिर्वाचित आमदारांना सिद्धरमय्या यांच्या नावाला मुख्यमंत्री म्हणून पसंती दिलेली असल्याने या पदावर सिद्धरमय्या यांची मुख्यमंत्री म्हणून तर डी. के. शिवकुमार यांची उपमुख्यमंत्रीपदी घोषणा होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -