घरदेश-विदेशCongress : अशी नरमाईची भूमिका परराष्ट्रमंत्र्यांना शोभत नाही, चीनप्रकरणी काँग्रेस आक्रमक

Congress : अशी नरमाईची भूमिका परराष्ट्रमंत्र्यांना शोभत नाही, चीनप्रकरणी काँग्रेस आक्रमक

Subscribe

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेश हा आपला भूभाग असल्याचा दावा चीनने वारंवार केला आहे. चीनने पुन्हा एकदा अरुणाचलमधील 30 ठिकाणांना नवी नावे देत पुन्हा एकदा आगळीक केली आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, अशी नरमाईची भूमिका पराराष्ट्रमंत्र्यांना शोभत नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. (Arunachal Pradesh China news)

हेही वाचा – Lok Sabha Election : आमचा दरवाजा ठोठावलात तर…; हेमंत गोडसेंच्या नाराजीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

- Advertisement -

चीनने सोमवारी भारतातील 30 विविध ठिकाणांच्या नावांची चौथी यादी जाहीर केली. त्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. यासंदर्भात जयशंकर म्हणतात, मी जर तुमच्या घराचे नाव बदलले, तर ते माझे होणार आहे का? अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने भागांची नावे बदलून काहीही होणार नाही. भारताचे सैन्य सीमेवर तैनात आहे. ते त्यांचे काम योग्यरित्या करतील अशाप्रकारे बाहेरच्या कोणीही नाव बदलल्याने काहीही फरक पडत नाही. जे आमचे आहे, ते आमचेच राहणार, असे एस. जयशंकर यांनी सुनावले आहे.

- Advertisement -

यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार मनीष तिवारी यांनी एस. जयशंकर यांच्यावर टीका केली आहे. चीनने अरुणाचल प्रदेशातील 30 ठिकाणांची नावे बदलली आहेत. पण परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणतात की, ‘मी तुमच्या घराचे नाव बदलले तर ते घर माझे होईल का?’ अशी कमकुवत आणि नरमाईची प्रतिक्रिया भारत सरकार आणि त्यांच्या परराष्ट्रमंत्र्यांना शोभत नाही, असे त्यांनी सुनावले आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : भाजपा कोणत्या तोंडाने ही बाब नाकारणार? रोहित पवारांचा थेट सवाल

चीन अरुणाचल प्रदेशला म्हणतो ‘जंगनान’

चीनी सरकारी मीडिया ‘ग्लोबल टाइम्स’ नुसार, चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने ‘जंगनान’मधील भौगोलिक नावांची चौथी यादी जाहीर केली. अरुणाचल प्रदेशला चीन ‘जंगनान’ म्हणतो आणि राज्यावर दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा करतो. मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रदेशासाठी 30 नावे देखील पोस्ट करण्यात आली आहेत. ही यादी 1 मेपासून लागू होणार आहे. तिथल्या मंत्रालयाने यापूर्वी 2017 मध्ये “जंगनान” मधील सहा ठिकाणांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली, तर 2021मध्ये 15 ठिकाणांची दुसरी यादी जाहीर केली होती. त्यानंतर 2023मध्येही 11 ठिकाणांच्या नावांसह तिसरी यादी जाहीर करण्यात आली होती.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपाकडेच; नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -