ईडीसमोर राहुल गांधींच्या हजेरीदरम्यान काँग्रेस दाखवणार ताकद, पक्ष मुख्यालय ते ईडी कार्यालयापर्यंत काढणार रॅली

नॅशनल हेरॉल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राहुल गांधी 13 जूनला ईडीसमोर हजर होणार आहेत

Rahul Gandhi connects Congress workers in UK to Sonia Gandhi over surprise call

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे ईडीसमोर हजेरी लावत असताना काँग्रेस राजकीय ताकद दाखविण्याची तयारी करीत आहे. नॅशनल हेरॉल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राहुल गांधी 13 जूनला ईडीसमोर हजर होणार आहेत. या राजकीय शक्ती प्रदर्शनात काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांचे म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य तसेच सर्व ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत. त्यासाठी या सर्व नेत्यांना सोमवारी सकाळी अकबर रोडवरील पक्षाच्या मुख्यालयात पोहोचण्यास सांगण्यात आले आहे. (rahul gandhi on National Herald Case )

काँग्रेस सोमवारी आपल्या मुख्यालयापासून एपीजे अब्दुल कलाम रोडवरील ईडी मुख्यालयापर्यंत रॅली काढणार असून, त्याद्वारे आपली राजकीय ताकद दाखवून देणार आहे. याला ठोस स्वरूप देण्यासाठी पक्षाने गुरुवारी संध्याकाळी आपले सरचिटणीस, राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांची व्हर्च्युअल बैठक बोलावली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणाला काँग्रेसने सूडबुद्धी म्हटले आहे, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावरील मनी लाँड्रिंग प्रकरणाला भाजपचा राजकीय सूड असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधींच्या हजेरीच्या निषेधार्थ पक्षाच्या राज्यातील नेत्यांना 13 जून रोजी धरणे आंदोलन करण्यास सांगितले आहे. ईडीने 2 जून रोजी राहुल गांधी आणि 8 जून रोजी सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र परदेशात असल्याने राहुल गांधींनी नंतरची वेळ मागितली होती, त्यानंतर त्यांना 13 जूनला हजर राहण्यास सांगण्यात आले. कोरोनाची लागण झाल्यामुळे सोनिया गांधी बुधवारी ईडीसमोर हजर राहू शकल्या नाहीत. या दोन नेत्यांचे जबाब मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत नोंदवले जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

काँग्रेसजन करणार ईडी आणि केंद्र सरकारचा निषेध

ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी केंद्र सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन केले. काँग्रेस मुख्यालयाबाहेर दिवसभर धरणे आंदोलन करणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांनी ईडीच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आणि ईडी एजन्सी तसेच सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सोनिया गांधी देश वाचवण्याविषयी बोलत आहेत, पण मोदीजी सांगत आहेत की ईडी तुम्हाला बोलावत आहे. सरकार ईडीचा पूर्णपणे गैरवापर करत आहे, असंही काँग्रेस नेते जगदीश शर्मा म्हणाले.


हेही वाचाः वांद्रे येथील शास्त्रीनगरमध्ये तीन मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू तर १८ जण जखमी