(Congress Vs BJP) नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आज, रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू आहे. पण त्यावरून आता काँग्रेसने यावर आक्रमक होत भाजपावर टीका केली आहे. भारतीय टीम पाकिस्तानी संघासोबत सामना खेळत आहे. हे कोणत्या प्रकारचे धोरण आहे? पाकिस्तान आपला शत्रू आहे तर, त्याच्याबरोबर क्रिकेट सामना खेळण्यात काय अर्थ आहे? दहशतवादाचा समूळ उच्चाटन होईपर्यंत आम्ही वाटाघाटी करणार नाही, असे सरकार वारंवार म्हणते. मग, दहशतवाद संपला का? काश्मीरमध्ये सैनिक शहीद होत नाहीत का? शहिदांच्या कुटुंबीयांना काय वाटेल? असे प्रश्न कर काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी, भाजपाच्याया धोरणाचा निषेध केला आहे. (Congress criticizes BJP over India Pakistan cricket match)
विद्यमान भारत सरकारचे धोरण समजण्याच्या पलीकडे आहे. हा सामना सरकारतर्फे खेळला जात आहे आणि उद्या त्यांच्याविरुद्धच वक्तव्ये केली जातील, असे सांगून रशीद अल्वी यांनी भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. आपली टीम मजबूत असून ती विजयी होईल, असे ते म्हणाले. पण प्रश्न संघाचा नाही. प्रश्न आहे तो, भारत सरकारने या सामन्याला परवानगी का दिली? जे दहशत निर्माण करत आहेत, त्यांच्याबरोबर तुम्ही सामना खेळत आहात. हे योग्य आहे का? शहिदांचे कुटुंब हे सहन करू शकतील का? तुम्ही त्यांच्या भावना दुखवत आहात. त्यांच्या अभिमानाला धक्का बसतो आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा – Manikrao Kokate case : पक्षपात केला जाणार नाही, निश्चिंत राहा; राहुल नार्वेकरांनी केले आश्वस्त
विद्यमान भारत सरकारचे धोरण समजण्याच्या पलीकडे आहे. भाजपा नेते पाकिस्तानविरुद्ध वारंवार वक्तव्ये करत असतात, निवडणुकीत काँग्रेस जिंकली तर पाकिस्तानात टाळ्या वाजवल्या जातील, असे निवडणुकीत सांगितले जाते. हा सामना सरकारतर्फे खेळला जात आहे आणि उद्या त्यांच्याविरुद्धच वक्तव्ये केली जातील, असे ते म्हणाले.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दरम्यान अटीतटीचा सामना सुरू आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याकडे लक्ष आहे. तर मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील संघ स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारताने आपल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशला सहा विकेट्सने हरवून जोरदार सुरुवात केली. दुसरीकडे, पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्ध 60 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
हेही वाचा – Uddhav Thackeray : माझ्या हिंदुत्वाची व्याख्या तरी आहे, तुमचे काय? काय म्हणाले उद्धव ठाकरे