नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार रणदीप सुरजेवाला यांनी हरियाणाच्या कैथलमध्ये भाजपबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रणदीप सुरजेवाला (Randeep surjewala) यांनी रविवारी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या समर्थकांना ‘राक्षस’ संबोधत अपमानास्पद शब्द वापरले. यानंतर भारतीय जनता पार्टीकडून काँग्रेस पक्ष आणि सुरजेवाला यांचा खरपूस समाचार घेतला असून, देशातील नागरिकांना राक्षस संबोधणे हे कितपत पचणी पडणार हे येणाऱ्या निवडणुकांमध्ये दिसून येईल असा टोलाही भाजपकडून लागवण्यात आला आहे.(Congress VS BJP This Congress leader called BJP supporters monsters There is opposition from BJP)
रणदीप सुरजेवाला यांनी रविवारी हरियाणाच्या कैथलमध्ये काँग्रेसच्या जन आक्रोश रॅलीला संबोधित करताना म्हटले होते की, नोकऱ्या देऊ नका, किमान नोकरीत बसण्याची संधी द्या. भाजप आणि जेजेपीचे लोक राक्षस आहेत. जे लोक भाजपला पाठिंबा देतात ते ‘राक्षस’ आहेत. काँग्रेस नेत्याने वापरलेल्या भाषेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विट केले की, राजकुमार यांना लॉन्च करण्यात वारंवार अपयशी ठरलेल्या काँग्रेस पक्षाने आता जनतेला शिविगाळ करण्यास सुरुवात केली आहे. तर त्यांनी देशवासीयांना उद्देश जनता जनार्दन बघा काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांचे ऐका, जे अंध झाले आहेत. पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या विरोधात बोलताना भाजपच्या समर्थकांना राक्षस म्हणून संबोधित आहेत असे ट्वीट करीत सुरजेवाला यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
हेही वाचा : लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या विशेष निमंत्रितांमध्ये महाराष्ट्रातील तीन मच्छीमार
जनताच धडा शिकवेल
भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करताना म्हटले आहे की, रणदीप सुरजेवाला आणि त्यांचा पक्ष अफझल गुरू, ओसामा आणि हाफिज सईदचा उल्लेख जी आणि साहेब करतात, पण आता ते मतदारांना शिव्या देत आहेत. भाजपला 22.9 कोटी मतदारांनी मतदान केले आहे. ते त्यांना राक्षस म्हणतात. आधी निवडणूक आयोगावर खोटी विधाने करतात, ईव्हीएमचा गैरवापर केल्याचे वक्तव्य करतात आणि आता जनतेवर अविश्वास निर्माण करतात? जनता त्यांना धडा शिकवेल! असे शहजाद पूनावाला यांनी म्हटले.
हेही वाचा : Aditya-L1 Mission : भारत करणार सूर्यनमस्कार; चांद्रयान – 3 नंतर ISROकडून विशेष मिशन आदित्य L-1 लाँच
टीकेनंतरही सुरजेवाला वक्तव्यावर ठाम
भारतीय जनता पक्षाच्या हल्ल्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी सोमवारी हरियाणातील भाजप आणि जननायक जनता पक्षाच्या युती सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, युवकांच्या भविष्यावर बुलडोजर चालविणारे लोक राक्षस नाहीत तर मग का देव आहेत. आपण कोरड्या धमक्यांना भीक घालत नाही तर यापुढेही जनतेचे प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.