Homeदेश-विदेशCongress Vs ECI : ईव्हीएममधील कथित गडबडीबाबत निवडणूक आयोगाचा खुलासा, तर काँग्रेसचा...

Congress Vs ECI : ईव्हीएममधील कथित गडबडीबाबत निवडणूक आयोगाचा खुलासा, तर काँग्रेसचा आक्षेप

Subscribe

जर निवडणूक आयोगाला सर्व काही योग्य वाटत असेल आणि त्यांची प्रक्रिया इतकी पारदर्शक असेल तर लोकांना शंका का घेत आहेत, हा देखील एक प्रश्न असल्याचे संदीप दीक्षित यांनी सांगितले.

(Congress Vs ECI) नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज, मंगळवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. दिल्लीतील सर्व 70 विधानसभा जागांसाठी 5 फेब्रुवारी 2025 रोजी मतदान होणार असून 8 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी, विरोधकांनी ईव्हीएमबाबत केलेले सर्व आरोप फेटाळले. मात्र, राजीव कुमार यांच्या या भूमिकेवरच काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. (Congress objects to Election Commission’s explanation regarding alleged EVM tampering)

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ईव्हीएममध्ये गडबड करण्यात आल्याचा आरोप हरियाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी केले होते. त्याला उत्तर देताना आयुक्त राजीव कुमार म्हणाले, ईव्हीएमबाबत अविश्वसनीयता तसेच कोणत्याही त्रुटीचा कोणताही पुरावा नाही. ईव्हीएममध्ये व्हायरस किंवा बग तसेच, अवैध मतांचा प्रश्नच उद्भवत नाही. यामध्ये काही गडबड होणे शक्य नाही. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय सातत्याने वेगवेगळ्या निर्णयांत हेच सांगत आहेत आणि आता याहून अधिक काय सांगता येईल? ईव्हीएममधील गडबडीचे आरोप निराधार आहेत, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

- Advertisement -

हेही वाचा – Anjali Damania : कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, चित्रा वाघांचा समाजकंटकांना इशारा

नवी दिल्लीतील काँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित हे मात्र, राजीव कुमार यांच्या या दाव्याशी सहमत नाहीत. ईव्हीएममध्ये गडबड होऊ शकत नाही, असे निवडणूक आयोग हे कसे म्हणू शकते? पूर्वीही गडबड व्हायची. आता बनावट पद्धतीने मतदान केले जाऊ शकते; त्यामुळे गडबड होत नाही, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. अशा स्थितीत निवडणूक आयोगाने त्यांच्या शंकांचे निरसन करायला हवे. जर त्यांना सर्व काही योग्य वाटत असेल आणि त्यांची प्रक्रिया इतकी पारदर्शक असेल तर लोकांना शंका का घेत आहेत, हा देखील एक प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

दिल्लीचा असा आहे कार्यक्रम

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 5 फेब्रुवारी रोजी मतदान तर, 8 फेब्रुवारीला मतमोजणी होईल.

  • विधानसभा निवडणुकीची अधिसूचना – 10 जानेवारी
  • उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख – 17 जानेवारी
  • उमेदवारी अर्जाची छाननी – 18 जानेवारी
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – 20 जानेवारी
  • मतदानाची तारीख – 5 फेब्रुवारी
  • मतमोजणीचा दिवस – 8 फेब्रुवारी

हेही वाचा – SS UBT on Fadnavis : मुख्यमंत्री हेच डमरू वाजवत आहेत…, ठाकरे गटाच्या रडारवर महायुती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -