राज्यसभेच्या निवडणुकीत राज्यस्थानमध्ये काँग्रेसचा तीन जागांवर विजय, मुकुल वासनिक यांच्या विजयाचा बुलडाण्यात जल्लोष

randeep surajewala

देशातील चार राज्यांमध्ये राज्यसभेची निवडणूक होत आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि राजस्थान अशा चार राज्यांचा समावेश आहे. हरियाणा आणि महाराष्ट्र राज्यात मतमोजणी प्रक्रियेला विलंब होत आहे. म्हणजेच अद्यापही मतमोजणीला सुरूवात झालेली नाहीये. मात्र, राजस्थानमधील राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. यावेळी राज्यस्थानमध्ये काँग्रेसने तीन जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसचे नेते प्रमोद तिवारी, मुकुल वासनिक आणि रणदीप सुरजेवाला यांचा विजय झाला आहे. तर भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे.

रणदीप सुरजेवाला यांना ४३ मतं मिळाली आहेत. तर मुकुल वासनिक यांना ४२ मतं आणि घनश्याम तिवारी यांचा ४३ मतांनी विजय झाला आहे. परंतु मुकुल वासनिक यांच्या विजयाचा बुलडाण्यात जल्लोष करण्यात येत आहे. वासनिक यांच्या विजयामुळे आज बुलडाण्यातील जयस्तंभ चौकात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने फटाके फोडून तसेच पेढा वाटत जल्लोष साजरा करण्यात आला आहे. तसेच भाजप समर्थित अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

राजस्थानमध्ये चार जागांसाठी मतदान पार पडले. मात्र, मैदानात पाच उमेदवार उतरल्याने राज्यसभेची ही निवडणूक रंगतदार ठरली होती. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड यांच्या नेतृत्वात हा जल्लोष साजरा करण्यात आला होता. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


हेही वाचा : ईडीचा डाव फसला आता रडीचा डाव सुरू, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा