घरकर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३Karnataka Election 2023: 'या' कारणांमुळे कर्नाटकात काँग्रेसला मिळाला ऐतिहासिक विजय

Karnataka Election 2023: ‘या’ कारणांमुळे कर्नाटकात काँग्रेसला मिळाला ऐतिहासिक विजय

Subscribe

कर्नाटकात काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवून ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे. तर भाजपला त्यांचा अतिआत्मविश्वास पराभूत होण्यासाठी कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु या ठिकाणी काँग्रेसने अशा कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली, ज्यामुळे कर्नाटक वासियांनी काँग्रेसला एक हाती सत्ता मिळवून दिली.

कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. बुधवारी (ता. 10 मे) या राज्यात विधानसभेच्या 224 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर शनिवारी (ता. 13 मे) या निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला. या राज्यामध्ये काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवून ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे. तर भाजपला त्यांचा अतिआत्मविश्वास पराभूत होण्यासाठी कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु या ठिकाणी काँग्रेसने अशा कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली, ज्यामुळे कर्नाटक वासियांनी काँग्रेसला एक हाती सत्ता मिळवून दिली. (Congress won historic victory in Karnataka due to ‘these’ reasons) देशामध्ये सध्या राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. तर आता कर्नाटकात देखील काँग्रेसची सत्ता आलेली आहे. याआधी कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता होती. पण सत्तांतर आणि भाजपचा राजकीय खेळ पाहता मतदारांनी भाजपला नाकारले असल्याचेच या निवडणुकीच्या निकालांमधून पाहायला मिळाले आहे.

हेही वाचा – Akola Riots : अकोल्यात दंगलसदृश परिस्थिती, शहरात कलम 144 लागू

- Advertisement -

कर्नाटक राज्यात निवडणूक लढवताना काँग्रेसने मुख्यत्वे करून भ्रष्टाचार या मुद्द्याला धरून निवडणुकांमध्ये प्रचार केला आणि तोच विषय त्यांनी केंद्रबिंदू बनवत प्रत्येक प्रचार सभेमध्ये लोकांच्या समोर आणला. त्यासोबतच त्यांनी मोफत वीज आणि तांदूळ देण्याचा निर्णय घेतला. याशिवाय बेरोजगार तरूण-तरूणींना भत्ता देण्याचे देखील काँग्रेसकडून वचन देण्यात आले. ज्यामुळे लोकांना ते आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे मात्र भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा समोर आणत लोकांमध्ये जातीय भेद वाढवल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामुळे या राज्यात असलेल्या 13 टक्के मुस्लिम मतदारांनी एकत्र येत काँग्रेसच्या पारड्यात आपली मते टाकली. ज्याचा सगळ्यात मोठ्यात फायदा या ठिकाणी पक्षाला झाल्याचे सांगण्यात येत आहे.

काँग्रेसची सत्ता येताच कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत पाच वचनांची पूर्तता करण्याचे आश्वासन देखील काँग्रेसकडून देण्यात आलेले आहे. यामध्ये राज्यातील सर्व घरांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज, प्रत्येक घरातील महिलेला दोन हजार रुपये प्रति महिना देण्याचे आश्वासन, त्याचबरोबर बीपीएलधारक कुटुंबांना प्रत्येक महिना दहा किलो तांदूळ देण्यात येणार असल्याचे वचन देण्यात आलेले आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेसने बेरोजगार तरुण-तरुणींना देखील आकर्षित करण्यासाठी महत्त्वाचे वचन दिले आहे. यामध्ये त्यांनी ज्या तरुणांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले आहे अशा तरुणांना दर महिन्याला तीन हजार रुपये, तर ज्या तरुणांचे डिप्लोमापर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले आहे अशा 18 ते 25 वयोगटातील तरुणांना प्रत्येकी महिना दीड हजार रुपये भत्ता देण्यात येणार असल्याचे प्रचाराच्यावेळी सांगण्यात आलेले आहे. यासोबतच सार्वजनिक किंवा शासकीय बसेसमध्ये महिलांना मोफत प्रवास देण्याचा देखील निर्णय काँग्रेसकडून घेण्यात आलेला आहे. ज्यामुळे कर्नाटकवासियांनी काँग्रेसला सत्तेत आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

कर्नाटकाच्या निवडणुकीमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने पाहायला मिळाली ती म्हणजे या निवडणुकीत स्ठानिक मुद्दा वि. हिंदुत्वाचा मुद्दा. काँग्रेसने स्थानिक मुद्द्यांना केंद्रीत करत ही निवडणूक लढवली. तर दुसरीकडे भाजपने नेहमीप्रमाणेच हिंदुत्वाचा मुद्दा समोर आणत या निवडणुकीत विजय मिळविण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रेसकडून याच्या विरोधात करण्यात आलेला प्रचार भाजपला भारी पडला. या ठिकाणी भाजपने सर्वच राज्यातील भाजपच्या नेत्यांना प्रचारासाठी बोलावले. तर काँग्रेसने मात्र स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून सर्वाधिक प्रचार केला, ज्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत झाला.

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासाठी या राज्यातील निवडणुक ही प्रतिष्ठेची होती. कारण पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या पक्षीय नेतृत्वात ही पहिलीच निवडणूक लढवण्यात आली. सुरूवातीला या राज्यात काँग्रेसचे दोन गट असल्याचे पाहायला मिळाले. सिध्दरमैया आणि डी. के. शिवकुमार यांच्यातील वाद समोर आल्यानंतर काँग्रेस कमकुवत होत असल्याचे पाहायला मिळाले. पण या वादाचा परिणाम निवडणुकीवर होऊ न देता, या सर्व गोष्टींना प्रचारापासून लांब ठेवण्यात आले.

“ही निवडणूक काँग्रेससाठी महत्त्वाची होती. या निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे काँग्रेसचे 2024 साठी मनोबल वाढणार आहे. 2024 मध्ये राहुल गांधी हेच देशाचे पंतप्रधान बनतील,” असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेता आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी व्यक्त केले आहे. काही महिन्यांपूर्वीच हिमाचल प्रदेशात देखील काँग्रेसची सत्ता स्थापन झाली आहे. त्यानंतर पक्षाला कर्नाटकात मिळालेला विजय हा लोकसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचा ठरु शकतो. तर राहुल गांधी यांचे खासदारकी पद रद्द होऊन देखील त्यांनी आणि प्रियंका गांधी यांनी प्रचार सभा घेत लोकांचा मिळवलेला विश्वास हे देखील पक्षाच्या विजयाचे महत्त्वाचे कारण ठरलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -