घरताज्या घडामोडीVideo - 'नरेंद्र मोदी जिंदाबाद'ची घोषणा देणाऱ्या व्यक्तीची केली धुलाई

Video – ‘नरेंद्र मोदी जिंदाबाद’ची घोषणा देणाऱ्या व्यक्तीची केली धुलाई

Subscribe

'नरेंद्र मोदी जिंदाबाद'अशी घोषणा देणाऱ्या व्यक्तीला काँग्रेसकडून चोप.

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात गेल्या तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरु आहे. गेले अनेक दिवस आंदोलन सुरु असूनही यावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यातच प्रजासत्ताक दिनी या आंदोलनाने हिंसक वळणही घेतले. परंतु, या कायद्याबाबत केंद्र सरकारने कोणतीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे आता राजकीय पक्ष देखील शेतकऱ्यांचे समर्थन करत त्यांना पाठिंबा देत आहे. याच पार्श्वभूमीवर, छत्तीसगड येथे नुकतेच काँग्रेसकडून कृषी कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले. त्या दरम्यान, एका व्यक्तीने ‘नरेंद्र मोदी जिंदाबाद’अशी घोषणा दिली आणि हिच घोषणा त्याला महागात पडली. घोषणा देताच त्या व्यक्तीला काँग्रेस कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले?

सध्या दिल्लीत कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असून शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी छत्तीसगड येथील पंखाजुर येथे काँग्रेसने ६ फेब्रुवारी रोजी आंदोलन केले होते. हे आंदोलन सुरु असताना आंदोलनातील एका व्यक्तीने ‘नरेंद्र मोदी जिंदाबाद’ची घोषणा केली. ही घोषणा ऐकताच इतर कार्यकर्त्यांनी त्याला आंदोलनातून बाहेर काढून मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र, यावेळी पोलीसही काही करु शकले नाही.

नव्या कृषी कायद्याविरोधात देशभर आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये बिहार, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगणा, महाराष्ट्र आणि पुणे याठिकाणी देखील आंदोलने करण्यात आली आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – खुशखबर! SBIच्या खातेधारकांना २ लाख रुपयांचा फायदा, लवकरच येणार नवी स्किम


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -