घरAssembly Battle 2022punjab assembly election 2022: अमृतसरमध्ये Conjoined twinsनी केलं मतदान, गोपनीयतेसाठी वापरला काळा...

punjab assembly election 2022: अमृतसरमध्ये Conjoined twinsनी केलं मतदान, गोपनीयतेसाठी वापरला काळा चष्मा

Subscribe

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू आहे. यूपी आणि पंजाबमध्ये आज(रविवार) मतदानाचा तिसरा टप्पा सुरू आहे. आतापर्यंत पंजाबमधील मतदान ४७ टक्क्यांच्या वर झालं आहे. यामध्ये अनेक लोकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी अमृतसरमध्ये Conjoined twinsनी मतदाना केलंय. तसेच त्यांच्यासाठी मतदानाच्या गोपनीयतेसाठी काळ्या चष्म्याचा वापर करण्यात आलाय. या जुळ्या मुलांची नावे सोहना आणि मोहना अशी आहेत. या दोन्ही मुलांनी अमृतसर जिल्ह्याच्या मनवल विभागात मतदानाचा हक्क बजावला आहे. मुख्य म्हणजे दोघांचीही दोन स्वतंत्र मतदार म्हणून गणना करण्यात आली आहे.

- Advertisement -

मतदानाची गुप्तता राखण्यासाठी रिटर्निंग ऑफिसरने (आरओ) त्यांना काळ्या रंगाचा चष्मा दिला होता. यावेळी त्यांनी मतदान केंद्र क्रमांक १०१ वर मतदान केलं. दोघेही एकत्र असले तरीसुद्धा हे दोघेही स्वतंत्र मतदार म्हणून आता ओळखले जातात. मोहना आणि सोहना हे दोघे भाऊ पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीत कामं करतात.

१९ वर्षीय सोहनाला डिसेंबर २०२१ मध्ये नोकरी मिळाली होती आणि त्याच्यासोबत मोहना PSPCL मध्ये इलेक्ट्रिकल उपकरणांच्या व्यवस्थापनात काम करतो. २००३ मध्ये या जुळ्या भावांचा जन्म एक यकृत, पित्ताशय आणि पायासमान झाला होता. त्यानंतर त्यांच्या पालकांनी त्यांना सोडून दिलं होतं. दिल्लीच्या एम्स रूग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते. परंतु दोघांमध्येही एकच जीव असल्यामुळे त्यांना वेगळे न करण्याचा मोठा निर्णय डॉक्टरांना घेतला. डॉक्टरांनी त्यांना अमृतसर येथील पिंगलवाडा चॅरिटेबल ट्रस्टकडे सुपूर्द केले. त्यानंतर त्यांना सोहना-मोहना असे नाव देण्यात आले. दोन महिन्यांच्या सोहना-मोहनाला ट्रस्टमध्ये आणण्यात आले होते.

- Advertisement -

दरम्यान, पंजाबमधील विधानसभेच्या ११७ जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होत आहे. पंजाबची २.१४ कोटी लोकसंख्या आज १३०४ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च २०२२ रोजी जाहीर होणार आहे.


हेही वाचा : PM Narendra Modi in Hardoi: दहशतवाद्यांना पाठिंबा देणारे काही राजकीय पक्ष, पीएम मोदींचा विरोधी पक्षांवर निशाणा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -