मुस्लिमांना दुय्यम नागरिक बनवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न, नसीरुद्दीन शाहांचा मोदींवर निशाणा

‘द वायर’चे वरिष्ठ पत्रकार करण थापर यांना शाह यांनी विशेष मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी आपली मतं परखडपणे व्यक्त केली. मुस्लिमांना उपेक्षितांप्रमाणे वागणूक दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलंय. मुस्लिमांना दुय्यम नागरिक बनवण्याचं काम सुरू आहे. हे सर्वच क्षेत्रांमध्ये होतंय. मुस्लिमांना असुरक्षित वाटावं यासाठी नियोजित प्रयत्न केले जातायत. आम्हाला असुरक्षित वाटावं असे प्रयत्न केले जातायत.

नवी दिल्लीः प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शहा हे त्यांच्या रोखठोक भूमिकेसाठी परिचित आहेत. नसिरुद्दीन शहा यांनी आता पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधलाय. मुस्लिमांमध्ये भीती पसरवण्याचा प्रयत्न केले जात आहेत,” असा आरोप बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी केल्यानं खळबळ उडालीय. मोदींच्या भारतात मुस्लीम असणं कसं वाटतं?,” या प्रश्नावर त्यांना पत्रकारांनी छेडले असता, मुस्लिमांना दुय्यम नागरिक बनवण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक पद्धतीने केला जातोय, असा आरोप शहा यांनी केला. हा देश आमचा आहे, आमच्या अनेक पिढ्या इथेच राहिल्यात आणि मृत्युमुखी पडल्यात. त्यामुळेच मुस्लिम नरसंहारासारख्या वक्त्यव्यांविरोधात लढण्यासाठी आम्ही तयार असल्याचंही नसिरुद्दीन शाह यांनी सांगितलंय.

‘द वायर’चे वरिष्ठ पत्रकार करण थापर यांना शाह यांनी विशेष मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी आपली मतं परखडपणे व्यक्त केली. मुस्लिमांना उपेक्षितांप्रमाणे वागणूक दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलंय. मुस्लिमांना दुय्यम नागरिक बनवण्याचं काम सुरू आहे. हे सर्वच क्षेत्रांमध्ये होतंय. मुस्लिमांना असुरक्षित वाटावं यासाठी नियोजित प्रयत्न केले जातायत. आम्हाला असुरक्षित वाटावं असे प्रयत्न केले जातायत. मात्र आपण याला घाबरता कामा नये,” असंही नसिरुद्दीन शहा यांनी अधोरेखित केलंय.

नसिरुद्दीन शाह म्हणाले, की, अशा प्रकारच्या वक्तव्यांविरोधात लढण्यासाठी मुस्लीम लोक तयार आहेत. कारण आम्ही सर्वजण इथलेच आहोत. आमच्या पिढ्यान्पिढ्या इथेच राहिल्यात आणि इथेच मृत्युमुखी पडल्यात. जे लोक अशा प्रकारची वादग्रस्त आणि भावना भडवणारी वक्तव्य करतायत ते लोक नक्की काय बोलतायत त्यांचा त्यांना अंदाज नसेल, असा टोलाही नसिरुद्दीन शाह यांनी लगावलाय.

यासंदर्भात स्वत:बद्दल बोलताना शाह म्हणाले की, “मला देशामध्ये असुरक्षित वाटत नाही कारण हेच माझं घर आहे. मात्र माझ्या मुलांचं काय होणार याची मला चिंता आहे,” असं म्हटलंय. धर्म संसदेमध्ये झालेल्या मुस्लिम नरसंहाराच्या वक्तव्यासंदर्भात बोलताना, २० कोटी लोकसंख्येला तुम्ही अशाप्रकारे संपवण्याचं वक्तव्य करु शकत नाही, असं नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलंय.