चीनकडून भारताविरोधात कटकारस्थान, LAC वर बांधली चौकी; अमेरिकेने केली पोलखोल

'पॉलिटिको' या वृत्तपत्राने बुधवारी दावा केला की, चीनने भारताच्या सीमेजवळ लष्करी चौकी बांधली आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीकडून पॅंगॉन्ग त्सो येथे मुख्यालय आणि सैन्याची चौकी बांधतानाचे फोटो सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज 'चायना पॉवर प्रोजेक्ट' ने नॅटसेक डेलीसोबत शेअर केले आहेत.

अमेरिकेचे खासदार राजा कृष्णमूर्ती (raja krishnamoorthi) यांनी चीनचा धोकादायक हेतू जगासमोर उघड केला आहे. भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पीपल्स लिबरेशन आर्मीने नवी चौकी बांधली आहे. यामुळे भारताविरुद्ध चीन काहीतरी कट रचत असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. तसंच, भारतीय सुरक्षेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांनाही खीळ बसत असल्याचं राजा कृष्णमूर्ती यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा ISIS चा प्रमुख नेता अल कुरेशी ठार; अमेरिका लष्काराला मोठं यश

‘पॉलिटिको’ या वृत्तपत्राने बुधवारी दावा केला की, चीनने भारताच्या सीमेजवळ लष्करी चौकी बांधली आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीकडून पॅंगॉन्ग त्सो येथे मुख्यालय आणि सैन्याची चौकी बांधतानाचे फोटो सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज ‘चायना पॉवर प्रोजेक्ट’ ने नॅटसेक डेलीसोबत शेअर केले आहेत.

हेही वाचा – अफगाणिस्तानच्या शाळेत बॉम्बस्फोट; १० विद्यार्थ्यांचा मृत्यू

चिनी कम्युनिस्ट पक्षाचे अत्याचार सुरूच

राजा कृष्णमूर्ती म्हणाले की, चिनी कम्युनिस्ट पक्षाने आपले जुने मार्ग सोडलेले नाहीत. देशांतर्गत दडपशाही, उइगर मुस्लिमांचा क्रूर छळ आणि ऑनलाइन चुकीची माहिती देण्याचे प्रयत्न अजूनही देशात वाढत आहेत. त्यामुळे भारताकडून तैवान जलडमरूमध्यपर्यंत त्याच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय लष्करी आक्रमणाचेही संकेत मिळत आहेत.

हेही वाचा – बिल्कीस बानो बलात्कार प्रकरण; ११ आरोपींच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

आक्रमकतेचा चेहरा जगासमोर आणावा लागेल

राजा कृष्णमूर्ती म्हणाले की, चीनच्या आक्रमक महत्त्वाकांक्षेला तोंड देताना, अमेरिका, भारत, तैवान आणि संपूर्ण प्रदेश लोकशाहीच्या पाठीशी उभा आहे. याचे स्पष्ट संदेश देण्यासाठी अमेरिकेने आपल्या मित्र राष्ट्रांसोबत सुरक्षा आणि गुप्तचर सहकार्य वाढवणे अत्यावश्यक आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या वाढत्या आक्रमकतेचा चेहरा जगासमोर आणावा लागेल.