घरदेश-विदेशगुजरातमध्ये पोलिस भरती पेपर लीक, २ अटकेत

गुजरातमध्ये पोलिस भरती पेपर लीक, २ अटकेत

Subscribe

गुजरातमध्ये पेपर फुटल्यानं पोलिस भरतीची परिक्षा रद्द करण्यात आली आहे.

गुजरातमध्ये पोलिस भरतीला पेपर फुटीचं ग्रहण लागलं आहे. पोलिस भरतीचे पेपर फुटल्यानंतर तासाभरापूर्वी पोलिस भरतीची परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणामध्ये भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच एका पोलिस सब- इन्स्पकेक्टरला देखील अटक करण्यात आली आहे. अहमदाबाद येथे पोलिस भरतीची परिक्षा होणार होती. पण, त्यापूर्वी पेपर फुटल्याचं लक्षात आल्यानं अखेर परिक्षा रद्द करण्यात आली. यामध्ये पोलिस सब- इन्स्पेक्टर पी. व्ही. पटेल, भाजपचा पदाधिकारी मुकेश चौधरी, मनहर पटेल आणि रूपल शर्मासह एका हॉस्टेल मालकाला देखील अटक करण्यात आली आहे. यामध्ये वडोदरा म्युनसिपल कार्पोरेशनचा कर्मचारी यशपाल सोलंकी फरार असून त्याला अटक करण्यासाठी पोलिस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणामध्ये भाजपचा पदाधिकारी मुकेश चौधरी, मनहर पटेल यांची नाव पुढे आल्यानंतर सत्ताधारी भाजपनं त्यांना पक्षातून निलंबित केलं आहे.

गुजरातमधील पोलिस भरतीला २४४० केंद्गांमधून ८.७५ लाख विद्यार्थी परिक्षेला बसले होते. पण, पेपर फुटीमुळे केवळ तासाभर अगोदर परिक्षा रद्द करत असल्याची घोषणा करण्यात आली. याप्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करू अशी घोषणा मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी केली आहे. विरोधकांनी मात्र याप्रकरणामध्ये चौकशी समितीची स्थापना करा अशी मागणी केली आहे. ज्यामुळे सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार चव्हाट्यावर येईल असं देखील विरोधकांनी म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -