Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश देशातील गोंधळ सावरण्यास घटना अपुरी, संजय राऊत यांच्याकडून न्याययंत्रणेवर प्रश्नचिन्ह

देशातील गोंधळ सावरण्यास घटना अपुरी, संजय राऊत यांच्याकडून न्याययंत्रणेवर प्रश्नचिन्ह

Subscribe

मुंबई : ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी भारतीय घटनेबद्दल सांगितले होते, “घटना दुटप्पीपणा करणार नाही. Politicians can be wild! राजकारणी बिघडतील व त्यातून सगळे बिघडेल. डॉ. आंबेडकरांचे हे म्हणणे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी सत्य ठरवले आहे. धर्माचे राजकारण, व्होट बँकेचे राजकारण घटना रोखू शकत नाही. देशाचा आजचा गोंधळ सावरण्यास घटना अपुरी पडत आहे, असे सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी न्याययंत्रणेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

सरकारला अडचणीचे ठरणारे निर्णय सुप्रीम कोर्ट घेत नाही व तारखांची शर्यत सुरूच ठेवते. मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका रोखण्याचे कारण नव्हते व कोर्ट निवडणुका घेऊ देत नाही. हे सरकारला व भाजपला हवेच आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर गेली 15 वर्षें तारखांशिवाय काहीच घडत नाही. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरचा निर्णय अधांतरी आहे. सर्व काही घटनेनुसार होईल याची खात्री कोणीच देऊ शकत नाही, असे संजय राऊत यांनी ‘सामना’तील ‘रोखठोक’ सदरात म्हटले आहे.

- Advertisement -

ही एक प्रकारची दहशत
राहुल गांधी यांनी मोदींची बदनामी केली या सबबीखाली त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावून त्यांची खासदारकी रद्द केली. त्यांचे घर रिकामे केले. त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास गुजरात हायकोर्टाने नकार दिला. फाशीची शिक्षा स्थगित होते. गौतम अदानींवरील आरोपांची चौकशी होत नाही. खुनी-दरोडेखोर लोकशाहीच्या मंदिरात उजळ माथ्याने वावरत आहेत. पण राहुल गांधींना एका क्षुल्लक प्रकरणात दिलासा द्यायला गुजरातचे न्यायालय तयार नाही. ही एक प्रकारची दहशत आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

हुकूमशहा हवा म्हणून हिंदुत्वाचे कार्ड
घटना नव्हे तर man can be wild! डॉ. आंबेडकरांचे सांगणे अशा वेळेला सत्य ठरते. संसदीय लोकशाहीच्या मुखवट्याखाली हुकूमशाही चालते आणि हुकूमशहा हवा म्हणून हिंदुत्वाचे कार्ड चालवले जाते. सामान्य मतदारांनी विचार करण्याचा हा काळ आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -