Corona Test: कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्यानंतर करावी लागणार चाचणी?; जाणून घ्या ICMRच्या नव्या गाईडलाईन्स

आंतरराज्य देशांतर्गत प्रवास करणाऱ्या व्यक्तींना कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. पण आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यांची चाचणी करणे गरजेचे आहे, असे आयसीएमआरने सांगितले आहे.

contacts of covid 19 patients dont need to be tested unless identified as high Risk government

देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) कोरोना चाचणीबाबत नवीन सुधारित गाईडलाईन्स जारी केली आहे. ज्यामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असे सांगण्यात आले आहे. आयसीएमआरने म्हटले की, कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना जोपर्यंत वय किंवा कॉमोरबिडीटीच्या आधारावर उच्च जोखीम म्हणून ओळखले जात नाही तोपर्यंत कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही.

प्रवासदरम्यान केल्या जात असलेल्या चाचण्यांबाबत आयसीएमआर म्हणाले की, आंतरराज्य देशांतर्गत प्रवास करणाऱ्या व्यक्तींना कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. पण आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यांची चाचणी करणे गरजेचे आहे. RT-PCR, TrueNat, CBNAAT, CRISPR, RT-LAMP, रॅपिड मोलेक्युलर टेस्टिंग सिस्टम किंवा रॅपिड अँटीजेन टेस्ट (RAT) द्वारे चाचणी केली जाऊ शकते.

आयसीएमआरच्या नव्या गाईडलाईननुसार, पॉइंट ऑफ केअर चाचणी (घरगुती किंवा स्व-चाचणी किंवा RAT) आणि मॉल्युकर चाचणीत एक पॉझिटिव्हला पुन्हा चाचणी करण्याशिवाय बाधित मानले पाहिजे. तसेच लक्षणे असलेल्या व्यक्तीने घरी केलेली चाचणी निगेटिव्ह आली असेल तर त्या व्यक्तीने आरटी-पीसीआर चाचणी केली पाहिजे.

दरम्यान आज केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये राज्यांना परिस्थितीवर नजर ठेवण्यास सांगितले आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहित केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, सध्याच्या स्थितीत कोरोना रुग्णांच्या संख्येच्या वाढीदरम्यान ५हून १० टक्के सक्रीय रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे. परिस्थिती वेगाने बदलत आहे आणि दैनंदिन रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. अशात रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याची संख्या वेगाने वाढू शकते. त्यामुळे यासाठी आपल्याला तयार व्हावे लागले. म्हणून कोरोना रुग्णसंख्या आणि सक्रीय रुग्णसंख्येवर कडक नजर ठेवा, असा सल्ला राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिला जात आहे.


हेही वाचा – Maharashtra Corona Update: राज्यात निर्बंध पहिल्याच दिवशी असरदार! कोरोना रुग्णसंख्येत ११ हजारांची घट