घरताज्या घडामोडीVideo : 125 वर्षीय स्वामी शिवानंदांपुढे मोदीही झाले नतमस्तक

Video : 125 वर्षीय स्वामी शिवानंदांपुढे मोदीही झाले नतमस्तक

Subscribe

125 व्या आपल्या दोन्ही पायांवर उभे, निरोगी स्वामी शिवानंद यांना पाहून पंतप्रधान मोही त्यांच्यासमोर नतमस्तक झाले. पुरस्कार घेण्यासाठी स्वामी शिवानंद यांना बोलावल्यानंतर त्यांनी थेट जाऊन पंतप्रधान मोदींना नमस्कार केला. त्याच वेळी पंतप्रधान मोदी देखील आपल्या खुर्चीतून उठून त्यांनीही स्वामी शिवानंद यांना वाकून नमस्कार केला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( president ram nath kovind)  यांच्या हस्ते सोमवारी 125 वर्षीय स्वामी शिवानंद यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ( 125 year old swami sivananda receives padma shri award)  योग क्षेत्रातील महत्त्वापूर्ण योगदानाबद्दल स्वामी शिवनांद यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते मंडळी उपस्थित होते. 125 व्या आपल्या दोन्ही पायांवर उभे, निरोगी स्वामी शिवानंद यांना पाहून पंतप्रधान मोदी त्यांच्यासमोर नतमस्तक झाले. पुरस्कार घेण्यासाठी स्वामी शिवानंद यांना बोलावल्यानंतर त्यांनी थेट जाऊन पंतप्रधान मोदींना नमस्कार केला. त्याच वेळी पंतप्रधान मोदी देखील आपल्या खुर्चीतून उठले आणि त्यांनीही स्वामी शिवानंद यांना वाकून नमस्कार केला.

पंतप्रधान मोदींनी स्वामी शिवानंद यांना नमस्कार केल्यानंतर शिवानंद यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना नमन केले. त्याचवेळी राष्ट्रपतीही आपल्या खुर्चीतून उठले शिवानंद यांना आपल्या हाताने उचलले आणि त्यांना पद्मश्री पुरस्कार बहाल केला. सध्या स्वामी शिवानंद यांच्या पद्मश्री पुरस्कार वितरण सोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 125व्या वर्षी इतक्या फिट स्वामी शिवानंद यांना पाहून सारेच अवाक झाले आहेत.

- Advertisement -

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. या पुरस्कारांमध्ये एकूण 128 जणांचा समावेश असून यातील 4 जणांना पद्मविभूषण पुरस्कार, 17 जणांचा पद्मभूषण पुरस्कार आणि 107 जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.

- Advertisement -

आज CDS जनरल बिपिन राव यांना राष्ट्रपतींच्या हस्ते मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. बिपिन रावत यांच्या दोन्ही कन्या कृतिका आणि तारिणी यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्याचप्रमाणे आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनाही राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. Padma Awards : दिवंगत CDS जनरल रावत यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’, गुलाम नबी आझादांचा ‘पद्मभूषण’ने सन्मान; पाहा संपूर्ण यादी


हेही वाचा – Uttarakhand CM 2022 : पुष्कर सिंह धामीच पुन्हा उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदी होणार विराजमान

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -