नवी दिल्ली: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या G-20 नेत्यांच्या डिनरसाठी आमंत्रित करण्यात आलेले नाही. या डिनरचे आयोजन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार आहेत. यावर तामिळनाडू काँग्रेसचे नेते मोहन कुमारमंगलम म्हणाले की, मोदी है तो मनू है. खर्गे दलित असल्याने त्यांना निमंत्रित करण्यात आले नाही. असाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे. (Controversy over not inviting Mallikarjun Kharge to G 20 dinner Congress leader says Narenda Modi hai to Manu hai )
मनूचा वारसा मोदी पुढे चालवत आहेत
मोहन कुमारमंगलम म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी महर्षी मनूचा वारसा पुढे चालवत आहेत. असे अनेक कार्यक्रम झाले ज्यात खालच्या जातीच्या नेत्यांना निमंत्रित केले गेले नाही. अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. नवीन संसदेच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते.
छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना डिनरचे निमंत्रण न मिळणे दुर्दैवी आहे. विरोधकांच्या नाराजीचा आदर केला पाहिजे.
राहुल गांधी सध्या युरोप दौऱ्यावर आहेत. 8 सप्टेंबर रोजी ते ब्रुसेल्स (बेल्जियम) येथे म्हणाले – G20 चे अध्यक्षपद मिळणे ही देशासाठी चांगली गोष्ट आहे. सरकारने मल्लिकार्जुन खर्गे यांना G20 साठी आमंत्रित केले नाही. देशातील 60% जनतेचे नेतृत्व करणाऱ्यांना ते महत्त्व देत नाहीत, हे यावरून सिद्ध होते. यातूनही सरकारची विचारसरणी दिसून येते, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
‘अशी’ असणार बैठक
नवी दिल्ली येथे 9 ते 10 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या G-20 शिखर परिषदेची तयारी पूर्ण झाली आहे. G-20 सदस्यांच्या पाहुण्यांच्या आगमनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. इटलीचे पंतप्रधान ज्योर्जिओ मेलोनी यांच्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे पत्नी अक्षता मूर्तीसोबत नवी दिल्लीत दाखल झाले आहेत.
दिल्लीत होणाऱ्या G-20 शिखर परिषदेला आता फक्त एक दिवस बाकी आहे. आज म्हणजेच 8 सप्टेंबर रोजी जी-20 गटातील बहुतांश दिग्गज नेते दिल्लीत पोहोचतील. त्यांच्या स्वागताची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांना देण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचे स्वागत जनरल व्ही के सिंग करणार आहेत. अश्विनी चौबे यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना घेण्यासाठी जाणार आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर ऋषी सुनक पहिल्यांदाच भारतात आले आहेत. जागतिक नेत्यांना भारताचा इतिहास, भारत मंडपम या शिखर परिषदेच्या ठिकाणी लोकशाही परंपरेसह डिजिटलमध्ये भारतानं केलेली क्रांती दाखवली जाईल. यासाठी भारत मंडपमच्या स्वागत समारंभाजवळ प्रदर्शन लावण्यात आले आहे. यामध्ये AI सारखे हाय एंड तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
( हेही वाचा: राहुल गांधींची लढाई देश, लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी – नाना पटोले )