घर देश-विदेश सनातन धर्म वक्तव्यावरून वाद: उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गेंविरोधात गुन्हा दाखल

सनातन धर्म वक्तव्यावरून वाद: उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गेंविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि डीएमके नेता उदयनिधी स्टॅलिन आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचा पूत्र प्रियांक यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका विकलानं दिलेल्या तक्रारीवरून उत्तर प्रदेश राज्यातील रामपूर येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामपूर: तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि डीएमके नेता उदयनिधी स्टॅलिन आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचा पूत्र प्रियांक यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका विकलानं दिलेल्या तक्रारीवरून उत्तर प्रदेश राज्यातील रामपूर येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म मुळापासून संपवायला हवा, अशा आशयाचं विधान केलं होतं. तर प्रियांक खर्गे यांनी त्या विधानाला सहमती दर्शवत पाठिंबा दिला, असा तक्रारकर्त्याचा आरोप आहे. त्यावरूनच हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Controversy over Sanatan Dharma statement Case filed against Udayanidhi Stalin Priyank Kharge)

उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म संपवण्याचे आवाहन केल्यानं त्यांच्यावर आणि खर्गे स्टॅलिन यांच्या  वक्तव्याचे समर्थन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसपी अशोक कुमार शुल्का यांनी सांगितलं की, आयपीसीच्या कलम 153A, 295A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

- Advertisement -

स्टॅलिन यांनी शनिवारी तामिळनाडूमध्ये एका कार्यक्रमात सनात धर्माची तुलना डेंगू आणि मलेरियासारख्या आजारांशी केली होती. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले. याप्रकरणी राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि भाजपने त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत काँग्रेसवर हल्ला चढवला होता.

तामिळवाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातनसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर, ते राजकीय विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत, असं असतानाही ते आपल्या वक्तव्यावर कायम आहेत. उदयनिधी यांनी सनातव धर्म नष्ट करण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. यानंतर राजकीय वातावरण तापले आहे.

धीरेंद्र शास्त्रींची संतप्त प्रतिक्रिया

- Advertisement -

धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, रावणाच्या खानदानातील लोक आहेत. जर भारतात राहणाऱ्या एखाद्या भारतीयानं असं म्हटलं असेल तर भारतात राहणाऱ्या संपूर्ण सनातनी लोकांच्या ह्रदयावर त्यांनी आघात केला आहे. हा प्रभू रामचंद्रांचा देश आहे. या भूमीवर सूर्य आणि पाणी राहणार तोपर्यंत हा सनातन धर्म राहणार, असे लोक भरपूर आले आणि गेले. अशा जनावरांना उत्तर देण्याची गरज नाही, असं म्हणत त्यांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

(हेही वाचा: अरे वा! चंद्राच्या पृष्ठभागाचे थ्रीडी चित्र; प्रज्ञान रोव्हरने पाठविली मोठी अपडेट )

 

- Advertisment -