घरदेश-विदेशमहिषासुराच्या जागेवर लावला महात्मा गांधींचा फोटो, वाद वाढल्यानंतर हिंदू महासभेची माघार

महिषासुराच्या जागेवर लावला महात्मा गांधींचा फोटो, वाद वाढल्यानंतर हिंदू महासभेची माघार

Subscribe

कोलकत्ता – पश्चिम बंगालच्या कोलकत्ता येथे एका देवीच्या मंडपात महिषासुराच्या जागेवर महात्मा गांधींसारखी असणारी एक प्रतिमा लावण्यात आली होती. यामुळे मोठा हलकल्लोळ माजला होता. मात्र, पोलिसांनी वेळेच हस्तक्षेप करून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला होता. त्यामुळे अनेक देवींच्या मूर्तीत महिषासुराची हत्या केल्याचा देखावा असतो. महिषासुराच्या या जागेवर महात्मा गांधींसारखा चेहरा असलेली प्रतिमा लावण्यात लावण्यात आला होता.

अखिल भारतीय हिंदू महासभाद्वारे येथे नवरात्रौत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी महिषासूर देवीच्या जागी महात्मा गांधींसारखी दिसणारी प्रतिमा लावण्यात आल्याचं एका पत्रकाराने उजेडात आणलं. त्यांनी आधी हा फोटो ट्विटरवर अपलोड केला होता. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणात्सव हा फोटो हटवण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी उत्तर २४ परगाणाचे टीटागढ पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. काँग्रेस नेता कौत्सव बागचीच्या आयोजकांनी याविरोधात तक्रार केली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी अखिल भारतीय हिंदू महासभेला मूर्तीचं रुप बदलण्याचे निर्देश दिले.

- Advertisement -

हिंदू महासभेचे अध्यक्ष चंद्रचूड गोस्वामी म्हणाले की, गांधींना आम्ही असूराच्या भूमिकेत पाहतो. म्हणून आम्ही येथे गांधींची छवी असलेली मूर्ती लावली. गांधींचा चेहरा लावून तुम्हाला नक्की काय साध्य करायचं आहे, असा प्रश्न विचारल्यावर चंद्रचूड यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. चंद्रचूड म्हणाले की, केंद्र सरकार गांधींना प्रत्येक ठिकाणी मोठेपणा देत आहे. केंद्राने प्रत्येक ठिाकाणाहून गांधींना हटवलं पाहिजे. त्याजागी नेताजी सुभाष चंद्र बोस आणि इतर स्वातंत्र्य सेनानींना पुढे केलं पाहिजे. गृहमंत्रालयातून दबाव आल्याने आम्हाला मूर्तीत बदल करावा लागला असंही चंद्रचूड म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -