नवी दिल्ली : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि देशाचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांचा पुतळा नुकताच पूर्व लडाखमध्ये चीनच्या सीमेजवळ भारतीय लष्कराने उभारला. मात्र, पुतळा उभारून चार दिवस होत नाहीत तोच या पुतळ्यावरून वाद निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. येथे छत्रपतींचा पुतळा उभारण्यावरून स्थानिक नाराज असल्याचे समजते. हा निर्णय घेण्याआधी स्थानिकांना विश्वासात घेतले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (controversy over the statue of chhatrapati shivaji installed by the army in ladakh know the reason)
लडाख मधील पँगॉंग सरोवराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. आता हा पुतळा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. लडाखच्या संस्कृतीत या पुतळ्याचे काय महत्त्व आहे, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. हा पुतळा उभारण्यापूर्वी स्थानिकांशी कोणत्याही प्रकारे चर्चा केली नसल्याचे स्थानिक सांगतात. भारतीय लष्कराने 26 डिसेंबरला या पुतळ्याचे अनावरण केले आणि दोन दिवसांनी त्याची घोषणा केली.
हेही वाचा – Welcoming New Year : नवीन वर्षाचे अजिबात स्वागत करू नका, मुसलमानांसाठी फतवा जारी
14 कोअरचे जनरल कमांडिंग अधिकारी लेफ्टनंट जनरल हितेश भल्ला यांच्या हस्ते याचे अनावरण करण्यात आले. मात्र, येथे या पुतळ्याचा काय संदर्भ आहे, असा प्रश्न चूशूलचे नगरसेवक कोंचोक स्टॅनजिन यांनी उपस्थित केला. तसेच, याबाबत लष्कराने स्थानिकांना आधी कल्पना न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात त्यांनी आपली ही नाराजी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.
As a local resident, I must voice my concerns about the Shivaji statue at Pangong. It was erected without local input, and I question its relevance to our unique environment and wildlife. Let’s prioritize projects that truly reflect and respect our community and nature. https://t.co/7mpu3yceDp
— Konchok Stanzin (@kstanzinladakh) December 29, 2024
ते म्हणतात, लडाखचा स्थानिक असल्याच्या नात्याने या पुतळा उभारण्यामागचा दृष्टीकोन मला समजायला हवा. येथील संस्कृती पूर्णपणे वेगळी आहे, त्यामुळे या पुतळ्याबाबत मला काही प्रश्न आहेत, असेही ते म्हणाले. आमच्या संस्कृतीशी संबंधित आणि समाजाशी निगडित असेल, अशा गोष्टींना लष्कराने येथे प्राधान्य द्यायला हवे, असे आमचे म्हणणे आहे.
कोंचोक यांच्याशिवाय येथील काही स्थानिक माजी लष्करी अधिकाऱ्यांच्या मते, येथे छत्रपती शिवरायांच्या ऐवजी डोगरा जनरल जोरावर सिंह यांचा पुतळा उभारणे संयुक्तिक ठरले असते. त्यांनी 19 व्या शतकात लडाख ताब्यात घेणाऱ्या जम्मूच्या सेनेचे नेतृत्व त्यांनी केले. त्यांच्यामुळेच भारतात लडाखचा समावेश झाला.
हेही वाचा – Supreme Court Collegium : न्यायाधीश म्हणून नातेवाईकांना प्राधान्य नको; नियुक्त्यांसंदर्भात कॉलेजिअम गंभीर
Edited by : Ashwini A. Bhatavdekar