घरदेश-विदेशबेकायदेशीर धर्मांतरणासाठी हवाल्यामार्फंत फंडिंग, मौलाना सिद्दीकीला ATS कडून अटक

बेकायदेशीर धर्मांतरणासाठी हवाल्यामार्फंत फंडिंग, मौलाना सिद्दीकीला ATS कडून अटक

Subscribe

बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात उत्तर प्रदेशातील ATS कडून मौलाना कलीम सिद्दीकीला अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी सिद्दकी हा ग्लोबल पीस सेंटर आणि जमीयत -ए-वलीउल्लाह संस्थेचा अध्यक्ष आहे. नागरिकांचे बेकायदेशीर धर्मांतर केल्या प्रकरणी त्याला उत्तर प्रदेश एटीएस पथकाने मेरठमधून ताब्यात घेतले आहे. या धर्मांतरणाच्या रॅकेट प्रकरणी यापूर्वी मुफ्ती काजी आणि उमर गौतम या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. या दोन्ही आरोपींचे मौलाना कलीम सिद्दकीसह संबंध असल्याचे उघड झाले आहे. परदेशातून कोट्यावधी रुपये सिद्दकीच्या बँक खात्यात येत असल्याचे आरोप करण्यात आहेत. बेकायदेशीर धर्मांतरणासाठी परदेशातून हवाल्यामार्फंत फंडिंग करत असल्याचे आरोपही सिद्दकीवर ठेवण्यात आले आहे.

सिद्दीकीला हवाल्यामार्फत परदेशातून फडिंग

उत्तर प्रदेश एटीएसने यासंदर्भात एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत एटीएसने, बेकायदेशीर धर्मांतरणासाठी मौलाना कलीम सिद्दीकी हवाल्यामार्फत परदेशातून फडिंग गोळा करत असल्याचे सांगितले आहेत. मौलाना सिद्दीकी सध्या एटीएसच्या ताब्यात असून त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. मौलाना कलीम यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना बेकायदेशीर धर्मांतरणासाठी आणि धर्मांतर रॅकेटमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करत होता. यानेच बॉलिवूड अभिनेत्री सना खान हिचे लग्न लावून दिले होते.

- Advertisement -

आत्तापर्यंत ३ कोटी रुपये सिद्दीकीच्या खात्यात जमा

मौलाना सिद्दीकीवर अनेक असह्य लोकांना खोटं अमिषे देत धर्मांतरणासाठी उत्तेजित करत होता. सिद्दीकी स्वत:च्या नावे एक संस्था चालवत होता तसेच अनेक मदरशांना फंडिंग करत होता. या धर्मांतरण रॅकेटसाठी मौलाना सिद्दीकीला परदेशातून हवाला आणि अवैध्यरित्या मोठ्याप्रमाणात पैसा पुरवला जात होता. उत्तर प्रदेश एटीएसच्या माहितीनुसार, मौलाना कलीम सिद्दीकीच्या बँक खात्यात १.५ कोटी रुपये बहरीनहून आले होते. अशाप्रकारे आत्तापर्यंत ३ कोटी रुपये सिद्दीकीच्या खात्यात जमा झाले होते.

ब्रिटिश संस्थांकडून या रॅकेटला ५७ कोटींचा निधी

यूपीचे एडीजी प्रशांत कुमार यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातून २० जून रोजी बेकायदेशीर धर्मांतर रॅकेट चालवणाऱ्या संशयित आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी उमर गौतम आणि त्याच्या साथीदारांना ब्रिटिशमधील एका संस्थेकडून ५७ कोटी रुपयांचे फंडिंग करण्यात आले होते. या फंडिंगचा तपशील आरोपी देऊ शकले नाही. त्यामुळे यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज दोन आरोपींना वगळता एकूण १० जणांना अटक करण्यात आली आहे, त्यापैकी ६ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले असून ४ जणांच्या विरोधात तपास सुरू आहे.

- Advertisement -

पाकिस्तानच्या तालिबान प्रेमामुळे अखेर SAARC बैठक रद्द


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -