‘या’ राज्यात 500 रुपयांत मिळणार गॅस सिलिंडर, मुख्यमंत्र्यांची घोषणा

cooking gas cylinder prices to be slashed to rs 500 in rajasthan from 1 april 2023 announces cm ashok gehlot

वाढत्या महागाईमुळे आधीच सामान्य जनता त्रस्त आहे, यात घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमतींमुळे आता खायचं कसं असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना भेडसावड आहे. अशातच राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी नागरिकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री गहलोत यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात केली आहे. यामुळे राजस्थानमध्ये अवघ्या 500 रुपयांना आता गॅस सिलिंडर मिळणार आहे. राजस्थान सरकारने दारिद्र्यरेषेखालील (BPL) आणि उज्ज्वला योजनेत नाव नोंदवलेल्या नागरिकांना 500 रुपयांत एलपीजी सिलिंडर (LPG Gas Cylinder) देणार असल्याची घोषणा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे.

यानुसार, दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना वर्षभरात 12 सिलिंडर मिळणार आहेत. यासोबत नागरिकांना ‘रसोई किट’मध्ये स्वयंपाकघरातील सामान देण्यात येईल असंही गेहलोत यांनी जाहीर केली, यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी घोषणा करत म्हटले की, ही नवीन योजना 1 एप्रिल 2023 पासून लागू केली जाईल. राज्यस्थानच्या जनतेला महागाईच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी हा प्रयत्न आहे. यासाठी सरकारने नवीन योजना सुरु केली आहे. या नव्या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील (BPL) आणि उज्ज्वला योजनेतील नागरिकांना अवघ्या 500 रुपयांत गॅस सिलिंडर मिळणार आहे. या योजनेत वर्षाला 12 सिलिंडर दिले जातील, यात गरीब आणि गरजू लोकांना सामावून घेत अधिक लाभ देणं हे सरकारचं लक्ष्य आहे.

अशोक गेहलोत यांनी याबाबत एक ट्विट देखील केले आहे. ज्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, ‘राज्य सरकार गरिबांना जास्तीत जास्त दिलासा देण्यासाठी सातत्याने लोककल्याणकारी निर्णय घेत आहे. यासाठी राज्य सरकार गरिबांना स्वस्त दरात सिलेंडर देण्याची योजना आणणार आहे.

सध्या देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 14.2 किलो एलपीजी गॅस सिलिंडर 1052.50 रुपये किमतीला मिळतोय. तर दिल्लीत 14.2 किलो घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1053 रुपयांना आहे. याशिवाय कोलकातामध्ये 1079 रुपये तर, चेन्नईत 1068.50 रुपयांना विकला जात आहे.


नेपाळमधून भारतात पुन्हा दगडफेक; काली नदीवर बंधारा बांधण्यात अडथळा