घर ताज्या घडामोडी Odisha Train Accident : कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात, २००हून अधिक प्रवासी जखमी

Odisha Train Accident : कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात, २००हून अधिक प्रवासी जखमी

Subscribe

ओडिशामध्ये कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ओडिशामधील बालासोर जिल्ह्यातील बहानागा रेल्वेस्थानाच्या जवळ ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत २००हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. तर ३० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisement -

कोरोमंडल एक्स्प्रेस मालगाडीला धडकल्यानंतर एक्स्प्रेसचे जवळपास १७-१८ डबे रुळावरुन खाली घसरले. यात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. काही प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मोबाईलच्या फ्लॅशमध्ये बचावकार्य केलं जात आहे. अपघातामुळे या मार्गावरील सर्व ट्रेन्स थांबवण्यात आल्या आहेत.

शालिमारहून चेन्नईला जाणाऱ्या कोरोमंडल एक्स्प्रेसचा अपघात झाला आहे. बचावकार्यासाठी पथकं घटनास्थळाकडे रवाना झाल्याची माहिती स्पेशल रिलीफ कमिशनर ऑफिसने दिली. बालासोरच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही बचावकार्याच्या दृष्टीने आवश्यक आदेश जारी केले आहेत.

- Advertisement -

या अपघातानंतर प्रशासनानं इंमरजेंसी कंट्रोल रुमचा नंबर 6782262286 जारी केला आहे. याशिवाय १५ अॅम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचवण्यात आल्या आहेत. काही जखमींना सोरो सीएचसी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


हेही वाचा : Wrestlers Protest: गैरवर्तन पाहून आम्ही व्यथित झालो, वर्ल्डकप विजेत्या संघाकडून कुस्तीपटूंचं समर्थन


 

- Advertisment -