घरताज्या घडामोडीCoronavirus: देशात करोनाचा चौथा बळी

Coronavirus: देशात करोनाचा चौथा बळी

Subscribe

देशात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पंजाबमधील ७० वर्षीय करोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत करोना व्हायरसमुळे भारतातील मृतांचा संख्या ४वर पोहोचली आहे. जर्मनीतून इटलीमार्गे परत आलेल्या या मृत व्यक्तीला छातीत दुखल्यामुळे त्याला पंजाबमधील नवांशहर जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याची करोना चाचणी करण्यात आली त्यावेळेस त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मात्र उपचारदरम्यान या ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

- Advertisement -

अगोदर करोना व्हायरसमुळे कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक-एक मृत्यू झाला होता. आतापर्यंत भारतात करोनाग्रस्ताची संख्या १६७वर पोहोचली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने उद्यापासून सर्व सरकारी आणि खासगी बस वाहतूक बंद ठेवली जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे. तसंच पंजाबमध्ये जमावबंदीचे आदेश दिला आहे.  २० पेक्षा अधिक लोकांना एकत्र एकाच ठिकाणी येण्यास मनाई केली आहे. याशिवाय उद्यापासून सुरू होणाऱ्या परीक्षा देखील पंजाब सरकारने रद्द केल्या आहेत.

आतापर्यंत करोनामुळे झालेले मृत्यू

११ मार्च – कर्नाटक – ७६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
१३ मार्च – दिल्ली – ६९ वर्षीय महिलेचा मृत्यू
१७ मार्च – मुंबई – ६४ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
१९ मार्च – पंजाब – ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: होय ! माझ्यावर करा करोनाची चाचणी, २ मुलांची आई ठरतेय अमेरिकन सुपर मॉम


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -