घरCORONA UPDATECororna: देशात कोरोनाचे ४०६७ रुग्ण, पुरुषांची संख्या महिलांपेक्षा दुपटीने जास्त!

Cororna: देशात कोरोनाचे ४०६७ रुग्ण, पुरुषांची संख्या महिलांपेक्षा दुपटीने जास्त!

Subscribe

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज संध्याकाळी ४ वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देशातल्या कोरोनाच्या फैलावाची सद्यस्थिती सांगितली आहे. यामध्ये देशात आत्तापर्यंत एकूण ४ हजार ६७ कोरोनाग्रस्त असून त्यात गेल्या २४ तासांत ६९३ नव्या रुग्णांची भर पडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एकूण रुग्णसंख्येपैकी १४४५ रुग्ण हे दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या तबलीगी मकरजशी संबंधित आहेत. तसेच, एकूण रुग्णांपैकी २९१ रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची देखील माहिती आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे.

पुरुष रुग्णांची संख्या महिलांपेक्षा दुपटीने जास्त!

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनाची लागण झालेल्या एकूण ४ हजार ६७ रुग्णांपैकी ७६ टक्के पुरूष असून २४ टक्के महिला आहेत. त्यामुळे भारतीय पुरुषांवर कोरोनाचा सर्वाधिक हल्ला झाल्याचं समोर येत आहे. देशभरात कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा देखील १०० च्या वर गेला असून त्यात देखील ७३ टक्के पुरुष असून २७ टक्के महिला आहेत.

- Advertisement -

मृत्यूंमध्ये वृद्धांची टक्केवारी जास्त

कोरोनाग्रस्तांपैकी इतरांची आकडेवारी पाहिली, तर यात ४७ टक्के रुग्ण हे ४० पेक्षा कमी वयाचे, ३४ टकक्के रुग्ण ४० ते ६० तर १९ टक्के रुग्ण ६० पेक्षा जास्त वयोगटातले आहेत. त्यामुळे लागण झालेल्या रुग्णांमध्ये वृद्धांची संख्या कमी आहे. मात्र, मृतांमध्ये वृद्धांची आकडेवारी जास्त दिसून येत आहे. एकूण मृतांमध्ये ६३ टक्के मृत्यू हे ६० पेक्षा जास्त वयोगटातले आहेत. त्याखालोखाल ३० टक्के मृत्यू ४० ते ६० वयोगटातले तर ७ टक्के मृत्यू ४० पेक्षा कमी वयोगटातले आहेत. त्यामुळे कोरोनामुळे वृद्धांचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त आहे.


Corona: सर्व खासदारांच्या पगारात वर्षभरासाठी ३० टक्के कपात!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -