घरCORONA UPDATECorona Update : चिंता कायम! कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५९ लाख पार

Corona Update : चिंता कायम! कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५९ लाख पार

Subscribe

देशात कोरोनाबाधितांचा आकडा ५९ लाख इतका झाला आहे. गेल्या २४ तासात ८५ हजार ३६२ इतक्या नव्या रुग्णांची वाढ झाली असून १ हजार ०८९ मृत्यूची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत देशभरात ५९ लाख ०३ हजार ९३३ इतके कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ९ लाख ६० हजार ९६९ इतके अॅक्टिव्ह केसेस असून ४८ लाख ४९ हजार ५८५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये ९३ हजार ३७९ जणांच्या मृत्युची नोंद आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत ७ कोटी ०२ लाख ६९ हजार ९७५ इतक्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तसेच काल, २५ सप्टेंबर रोजी १३ लाख ४१ हजार ५३५ इतक्या चाचण्या करण्यात असल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण असून काल दिवसभरात राज्यात १९ हजार ५९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. तसेच आतापर्यंत एकूण ९ लाख ९२ हजार ८०६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट ७६.३३ टक्के एवढा झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६७ टक्के एवढा आहे. मात्र गेल्या २४ तासांत राज्यात १७ हजार ७९४ नवे कोरोनाबाधित आढळले असून ४१६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १३ लाख ७७५ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३४ हजार ७६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा –

या धोरणाचा लाभ बड्या भांडवलदारांना; कृषी विधेयकावरून मोदी सरकारवर टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -