घरCORONA UPDATEचीनमध्ये कोरोनाचा पुन्हा हाहाकार; नागरिकांवर निर्बंध, अडीच लाख बेड्सची व्यवस्था

चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा हाहाकार; नागरिकांवर निर्बंध, अडीच लाख बेड्सची व्यवस्था

Subscribe

एकीकडे जगभरातील कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत असताना चीनमध्ये मात्र, कोरोनाने पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. चीनच्या विविध शहरांत सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे तिथे कायमची उपाययोजना आखण्याच्याही सूचना देण्यात येत आहेत. 

बीजिंग – चीनच्या दक्षिण ग्वांग्झू शहरांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये (Corona Update) वाढ होत आहे. त्यामुळे या ठिकाणी अडीच लाख बेड्सचे सुसज्ज रुग्णालय बांधण्यात येणार आहे. राष्ट्रीय पातळीवर कोरोनाविरोधी उपायांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न सुरू असताना चीनमध्ये कोरोनाचा (Corona in China) हाहाकार उडाल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून सुमारे 1.3 कोटी लोकसंख्या असलेल्या ग्वांग्झू शहरात (Guangzhou City) साथीचा प्रसार सुरू झाला आणि गेल्या 24 तासांत संसर्गाची 9,680 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

हेही वाचा गाझा पट्टीतील इमारतीमध्ये भीषण आग; 21 जणांचा होरपळून मृत्यू,अनेक जखमी

- Advertisement -

अमेरिका आणि इतर मोठ्या देशांच्या तुलनेत चीनमध्ये संसर्गाची संख्या कमी आहे, परंतु सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष प्रत्येक रुग्णाला वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहे. क्षेत्र, शाळा आणि व्यवसायांवर वारंवार निर्बंध लादल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

साउथ मेट्रोपोलिस डेली या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, शहराचे अधिकारी वांग बाओसेन म्हणाले, “ग्वांगझूमधील साथीची परिस्थिती अजूनही खूप गंभीर आहे. उपचारांसाठी त्यांना स्वतंत्र केंद्र किंवा रुग्णालयात पाठवण्यात येत आहे.” सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओनुसार ग्वांगझूमधील संतप्त रहिवाशांनी सरकारने लादलेले निर्बंध झुगारले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – नोकरी टिकवायचीय? मग जास्त काम करा, ट्विटरच्या कर्मचाऱ्यांसाठी नवा फतवा

संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी ग्वांगझूमध्ये अतिरिक्त 246,407 खाटा उभारल्या जातील, ज्यात रुग्णालयातील क्वारंटाइन वॉर्डमध्ये 132,015 आणि संक्रमित परंतु लक्षणे नसलेल्यांसाठी 114,392 बेड आहेत. कम्युनिस्ट पक्षाने गेल्या आठवड्यात क्वारंटाइन कालावधी कमी करून आणि इतर नियम बदलून कोविड-19 विरोधी उपाय सुलभ करण्याचे आश्वासन दिले.

एकीकडे जगभरातील कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत असताना चीनमध्ये मात्र, कोरोनाने पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. चीनच्या विविध शहरांत सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे तिथे कायमची उपाययोजना आखण्याच्याही सूचना देण्यात येत आहेत.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -