घरताज्या घडामोडीराज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी गाफील राहू नये, केंद्राकडून राज्यांना पत्र

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी गाफील राहू नये, केंद्राकडून राज्यांना पत्र

Subscribe

देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने (Corona Virus) हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. कोरोना विषाणूची संख्या वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) सर्व राज्यांना पुन्हा एकदा पत्र लिहिलं आहे. मागील २४ तासांत महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि दिल्लीत कोरोनाचे ८१ टक्के इतके रूग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचे रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आरोग्य मंत्रालयाने पुन्हा एकदा सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहून कोरोनाच्या गाईडलाईन्सचं पालन करण्यास सांगितलं आहे.

मागील दोन आठवड्यांत देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी गाफील राहू नये. तसेच कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन निष्काळजीपणा करू नये. साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यांना सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील, जसे आपण आत्तापर्यंत करत आलो आहोत, असे केंद्रीय आरोग्यमंत्री राजेश भूषण (Rajesh Bhushan) यांनी पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

केरळ, महाराष्ट्र, दिल्ली आणि कर्नाटकासह इतर राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना एक प्रकारचे आवाहन या पत्रातून करण्यात आले आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७ हजार २४० नवीन रुग्ण आढळले आहेत. तर काल देशात ५ हजार २३३ नवे रुग्ण आढळले होते. दिल्लीत कोरोना रूग्णांची संख्या १९,१०,६१३ इतकी झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा वेग पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनला आहे. राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ हजार ८१३ इतके नवीन रुग्ण आढळले आहेत. तर एका कोरोना बाधित रूग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


हेही वाचा : राज्यात मागील २४ तासांत २ हजार ८१३ रुग्णांची नोंद, तर मुंबईकरांच्या चिंतेत वाढ


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -