Corona case in Jaipur: जयपूरमध्ये एकाच कुटुंबातील पाच सदस्यांना कोरोनाची लागण, दक्षिण आफ्रिकेतून परतले नातेवाईक

भारतासह संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसनंतर ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका वाढत आहे. कोविड-१९ च्या नव्या व्हेयिएंट दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का दिला आहे. भारतासह अनेक शहरांमध्ये कोरोनाचे नवीन रूग्ण समोर आले आहेत. राजस्थानची राजधानी जयपूर मध्ये एकाच कुटुंबातील पाच सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर येथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दक्षिण आफ्रिकेतून परतले नातेवाईक

जयपूरच्या आदर्शनगर मधील एकाच कुटुंबाील पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं की, त्यांचे नातेवाईक दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले. त्यानंतर नातेवाईकांच्या संबंधात हे पाच जण आले. चिकिस्ता विभागाच्या टीमने त्यांना घरातचं क्वाइंटाईन केलं आहे. टीमने त्यांचे सॅम्पल जीनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.

देशात ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका वाढला

देशातील वेगवेगळया शहरांमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. महारष्ट्रात ओमिक्रॉनची संख्या वाढून २८ इतकी झाली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं की, हाय रिस्क देशातून भारतात आलेल्या काही प्रवाशांची चाचणी केली असता, त्यांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची चाचणी करून त्यांचे सॅम्पल जीनोम सिक्वेंसिंगला पाठवण्यात येणार आहेत. मुंबईत १० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कलावधीमध्ये २ हजार ८६८ इतके प्रवासी मुंबईत आले आहेत. यामध्ये ४८५ प्रवाश्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. तर काही प्रवासी आंतरराष्ट्रीय विमान मार्गाद्वारे मुंबईमध्ये आले होते. ४८५ मधून ९ प्रवासींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान, कर्नाटकात ओमिक्रॉनचे दोन रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे येथील परिसरात एकच खळबळ उडाली. कर्नाटकात ओमिक्रॉनचे दोन रूग्ण आढळल्यानंतर देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी तोंडावर मास्क लावण्यासह सर्व नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कर्नाटकात ओमिक्रॉनचे रूग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्रातील प्रशासनही अलर्ट झालं आहे. परंतु राज्यातही ओमिक्रॉनचे २८ संशयित रूग्ण सापडल्याची खळबळजनक माहिती मिळते आहे. यामध्ये फक्त ओमिक्रॉनचे १० रूग्ण हे मुंबईत आढळून आले आहेत.


हेही वाचा: राज ठाकरे निघाले दौऱ्यावर ! मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह अयोध्येचा दौरा करणार – बाळा नांदगावकर