घरताज्या घडामोडीCoronavirus: जगभरातील कोरोना रुग्णसंख्येत दोन महिन्यांतील सर्वात मोठी घट, WHOची माहिती

Coronavirus: जगभरातील कोरोना रुग्णसंख्येत दोन महिन्यांतील सर्वात मोठी घट, WHOची माहिती

Subscribe

गेल्या आठवड्यात जगभरात जवळपास ४० लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दोन महिन्यांनंतर अधिक काळात पहिल्यांदा सर्वात मोठी कोरोना रुग्णांमध्ये घसरण झाली आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. मंगळवारी जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या आठवड्याच्या आकडेवारीमध्ये म्हटले की, गेल्या आठवड्याच्या तुलनेत जगभरातील सर्व क्षेत्रात कोरोना रुग्णांमध्ये घट होताना दिसत आहे. अलीकडच्या आठवड्यात ४४ लाख कोरोना रुग्णांची नोंद केली गेली होती.

जगभरातील कोरोना मृत्यूच्या संख्येत देखील घट झाली आहे आणि जवळपास ६२ हजार मृत्यूची नोंद झाली आहे. सर्वाधिक घट दक्षिण पूर्व अशियामध्ये झाली आहे. तर आफ्रिकेमध्ये मृत्यूच्या संख्येत सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. सर्वात जास्त नवे रुग्ण अमेरिका, ब्रिटन, भारत, इराण आणि तुर्कीमध्ये आढळत आहे. तसेच कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट आता १८० देशांमध्ये पोहोचला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, वृद्धांच्या तुलनेत लहान मुलांवर कोरोनाचा प्रभाव अधिक होताना दिसत आहे. २४ वर्षांपेक्षा कमी वयातील लोकांना कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूंची टक्केवारी सुमारे ०.५ टक्के आहे.

- Advertisement -

फ्रान्समध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण अनिवार्य

फ्रान्सने आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण अनिवार्य केले आहे. जर त्यांनी लस घेतली नाही तर ते काल, बुधवारपासून कामावर जाऊन शकणार नाही, असा आदेश काढण्यात आला होता. फ्रान्समध्ये तीन लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले नाही आहे. कारण रुग्णालयाला त्यांचे कर्मचारी कमी होण्याची भिती आहे.

कंबोडियामध्ये उद्यापासून सहा ते ११ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला होणार सुरुवात

कंबोडियामध्ये शुक्रवारपासून सहा ते ११ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. पंतप्रधान हुन सेन बुधवारी म्हणाले की, कोरोना महामारीमुळे बऱ्याच काळापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे मुलांना शाळेत सुरक्षित जाण्यासाठी सरकारने लहान मुलांच्या लसीकरणाचे पाऊल उचलले आहे. तसेच लवकरच सरकार तीन ते पाच वर्षातील मुलांचे देखील लसीकरण सुरू करण्यावर विचार करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Vaccine: एका डोसमध्ये काम तमाम! Sputnik Lightला भारतात ट्रायलासाठी मिळाली मंजूरी


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -