Corona cases in India : कोरोनाचा वेगवान फैलाव; रुग्णसंख्या थेट 2.47 लाखांवर, ओमिक्रॉनबाधित 5000 पार

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, 30 डिसेंबर रोजी कोरोना पॉझिटिव्ह दर 1.1 टक्के होता, जो 12 जानेवारी रोजी 11.05 टक्के झाला आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, यूपी, केरळ, गुजरात या राज्यांमध्ये कोरोनाचे दिवसेंदिवस वाढत असलेले रुग्ण आता चिंतेचा विषय ठरत आहे.

Corona cases in India India reports 247417 new COVID cases in 24 hours omicron cases also cross 5000
Corona cases in India : कोरोनाचा वेगवान फैलाव; रुग्णसंख्या थेट 2.47 लाखांवर, ओमिक्रॉनबाधित 5000 पार

संपूर्ण जग कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या सावटाखाली जगत आहे. या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभरात आपले हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जगातील सर्वच देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली आहे. देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 2 लाख 47 हजार 417 नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्या रुग्णांमुळे देशातील सक्रिया रुग्णांची संख्या ही 11 लाख 17 हजार 531 वर पोहचली आहे. त्यामुळे देशातील आज नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या बुधवारीच्या तुलनेत 27.1 टक्क्यांनी जास्त आहे. तर गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णांमध्ये 1,62,212 ने वाढ झाली असून एकूण 84,825 रुग्ण बरे झाले आहेत. देशातील कोरोनातून बरे झालेल्यांची एकूण  संख्या 3,47,15,361 वर पोहचली आहे.

कोरोनाचे सर्वाधित रुग्णसंख्या असलेल्या टॉप 5 राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 46,723 नवे रुग्ण आढळले आहेत. यानंतर दिल्लीत 27,561, पश्चिम बंगालमध्ये 22,155, कर्नाटकात 21,390 आणि तामिळनाडूमध्ये 17,934 रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. या पाच राज्यांमधून 54.87 टक्के नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर 18.88 टक्के नवीन रुग्ण एकट्या महाराष्ट्र आहेत.

गेल्या 24 तासांत देशात 481 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या ही 4,84,859 वर पोहोचली आहे. यात केरळमध्ये सर्वाधिक 300 मृत्यू झाले आहेत, तर दिल्लीत 40 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान कोरोनाच्या डेली पॉझिटिव्हीटी रेट हा 13.11 टक्के आहे तर आठवड्याचा पॉझिटिव्हीटीचा रेट हा 10.80 टक्क्यांवर पोहचला आहे. देशात आतापर्यंत एकूण 69.73 कोटी चाचण्या झाल्या आहेत. यात देशातील कोरोनातून बरा होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण हे 95.59 टक्के झाले आहे. तर लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 154.61 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.

देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 5 हजारांच्या पुढे

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अहवालानुसार, भारतात ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ही 5 हजारांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 5488 रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. तर महाराष्ट्र 1,281 आणि राजस्थान 645 सह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दिल्लीत आतापर्यंत ओमिक्रॉनचे 546 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय कर्नाटक (479), केरळ (350), पश्चिम बंगाल (294), उत्तर प्रदेश (275), गुजरात (236), तामिळनाडू (185) आणि हरियाणा (162) मध्ये रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. आतापर्यंत आढळलेल्या ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांपैकी 1,805 रुग्ण बरे झाले आहेत. देशात सध्या ओमिक्रॉनचे 3,063 रुग्ण आहेत.

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, 30 डिसेंबर रोजी कोरोना पॉझिटिव्ह दर 1.1 टक्के होता, जो 12 जानेवारी रोजी 11.05 टक्के झाला आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, यूपी, केरळ, गुजरात या राज्यांमध्ये कोरोनाचे दिवसेंदिवस वाढत असलेले रुग्ण आता चिंतेचा विषय ठरत आहे.


PM Modi Meeting: कोरोना स्थितीवर पंतप्रधान मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद