घरCORONA UPDATECorona Crisis: कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा अधिकृत आकडेवारीपेक्षा दुप्पट,WHOची धक्कादायक माहिती

Corona Crisis: कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा अधिकृत आकडेवारीपेक्षा दुप्पट,WHOची धक्कादायक माहिती

Subscribe

२०२०मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत जगभरात जवळपास ३० लाख लोकांनी आपला जीव गमावला.

कोरोना महामारीशी (Covid19) संपूर्ण जग लढत आहे. रोज अनेकांचे मृत्यू होत आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) नेहमीच जगाला कोरोना विषयी नवीन माहिती आणि सल्ले देत असते. यावेळी मात्र whoने एक धक्कादायक घुलासा केला आहे. त्यामुळे सर्वांना हारदरा बसू शकतो. WHOच्या म्हणण्यानुसार, जगात आतापर्यंत कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांचा खोटा आकडा समोर आणला गेला आहे. वास्तविक कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा खूप जास्त आहे. २०२०मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत जगभरात जवळपास ३० लाख लोकांनी आपला जीव गमावला. मात्र हा मृत्यूचा आकडा अधिकृत आकड्यांच्या दुप्पट असल्याचा खुलासा WHO ने केला आहे. (Death toll from corona doubles official figures in world WHO Say)

WHO ने त्यांच्या जागतिक आरोग्य अहवालात असे म्हटले आहे की,३१ डिसेंबर २०२० पर्यंत जगभरात ८ कोटी २० लाखांहून अधिक लोक कोरोनाबाधित होते. त्यापैकी १८ लाखांहून अधिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र प्रत्यक्षात हा आकडा फार जास्त होता. जगभरात याहून अधिक मृत्यू झाले आहेत. जगासमोर मृत्यूचा खोटा आकडा आणण्यात आला. WHOच्या प्रमुखांनी असे म्हटले आहे की, जोपर्यंत जगभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम पार पडत नाही तोवर मृत्यूंची संख्या वाढत राहिल. त्यामुळे सर्व देशांना लवकरात लवकर लस घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

आजतकने दिलेल्या माहितीनुसार, २०२०मध्ये ३० लाख लोकांच्या मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. प्रत्यक्षात या अधिकृत आकड्यांच्या तब्बल १२ लाखांनी मृत्यूंची संख्या अधिक आहे. २०२०मध्ये जगातील मृतांचा आकडा अत्यंत कमी दाखवण्यात आला आहे.


हेही वाचा – Air Indiaच्या सर्व्हरवर सायबर अटॅक; ४५ लाख प्रवाशांचा डेटा चोरीला

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -