Corona Crisis: WHOने का दिला मीठाचे सेवन कमी करण्याचा सल्ला? जाणून घ्या

दररोज जेवणात ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठाचे सेवन करा

Corona Crisis: Why WHO Advises to Reduce Salt Consumption?
Corona Crisis: WHOने का दिला मीठाचे सेवन कमी करण्याचा सल्ला? जाणून घ्या

कोरोना महामारी (Covid 19) सुरु झाल्यापासून जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगाला अनेक सल्ले आणि वेळोवेळी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.  आताही WHOने कोरोनाच्या महामारीपासून वाचण्यासाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी मीठाचे जास्त सेवन न करण्याचा सल्ला WHO ने दिला आहे.  मात्र WHOने असे का म्हटले आहे? जाणून घ्या. WHO च्या म्हणण्यानुसार, खाण्याच्या किंवा पिण्याच्या पदार्थ्यांत जास्त प्रमाणात मीठाचे सेवन केल्यामुळे लोकांमध्ये ह्रदयरोग आणि स्ट्रोक सारख्या समस्या उद्धभण्याच्या शक्यता आहेत. दरवर्षी जागतिक पातळीवर ११ लाख लोकांचा मृत्यू हा संतुलित आहार न केल्यामुळे होता व त्यातील ३ लाख लोकांचा मृत्यू हा मीठाचे अधिक सेवन केल्यामुळे होत आहे, असेही WHOने म्हटले आहे. दररोज जेवणात ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठाचे सेवन करा असा सल्ला WHO ने दिला आहे.

WHO ने दिलेल्या माहितीनुसार, शरीरात सोडीयमचे प्रमाण वाढल्यास रक्तदाब वाढतो. त्यामुळे ह्रदयरोगाचा धोका संभवतो. जगभरात कोरोना व्यतिरिक्त होणारे मृत्यूमध्ये ह्रदयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या अधिक आहे. आतापर्यंत ३२ टक्के लोकांचा मृत्यू हा ह्रदयरोगामुळे झाला आहे. त्याचबरोबर शरीरातील सोडीयमचे प्रमाण वाढल्यास स्थूलता,किडणीचे आजार, गॅस्ट्रिक कॅन्सर यासांरखे आजार होतात.

सोडीयम क्लोराइड नावाचे एक रसायन असते. ज्यात सोडीयम नावाचे खनिज आपल्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित करते. शरीरात मीठाचे म्हणजेच सोडीयमचे प्रमाण वाढल्यास त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. प्रत्येक देशात खाल्ली जाणारी चपाती, भात, मांस त्याचप्रमाणे पनीर,दही या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणाच सोडीयमची मात्र असते,असे WHOने म्हटले आहे. त्याचप्रमाणे लोकांच्या जेवणातील मीठाचे सेवन कमी करण्यासाठी लोकांना आहाराचा योग्य पर्याय उलब्ध करुन देणे गरजेचे आहे. शरीरात खाण्याच्या आणि पिण्याच्या पदार्थांमधून शरीरात योग्य प्रमाणात सोडीयम जाणे गरजेचे आहे.

 


हेही वाचा – तर लसींवरही परिणाम होऊ शकतो, पूनावालांच्या झेड प्लस सुरक्षेसाठी हायकोर्टात याचिका