घरCORONA UPDATEचीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; सामूहिक चाचणीचे आदेश, घरातून बाहेर न पडण्याचा फतवा

चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; सामूहिक चाचणीचे आदेश, घरातून बाहेर न पडण्याचा फतवा

Subscribe

शांघाय – ज्या देशातून कोरोनाचा (Corona Virus) प्रसार झाला होता, तो देश पुन्हा एकदा कोरोनाच्या (Corona in china) विळख्यात अडकला आहे. यावेळेस कोरोनाची व्यापाराची राजधानी असलेल्या शांघायमध्ये (Corona in Shanghai) कोरोनाने धुमाकूळ माजवला असून सरकारने कोणालाही घराबाहेर न पडण्याचे आदेश दिले आहेत. तसंच, शांघायमधील यांगपू जिल्ह्यातील १३ लाख लोकांना कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. ही चाचणी होत नाही, तोवर घराबाहेर न पडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा – सावधान! कोरोनाची आणखी एक लाट येणार? वॉशिंग्टन विद्यापीठाने सादर केला अहवाल

- Advertisement -

अडीच कोटी लोकसंख्या अशलेल्या शहराची स्थानिक अर्थव्यवस्था कोरोनाच्या संसर्गामुळे कोलमडून पडली आहे. गेल्या लॉकडाऊनमध्ये शहरात अन्नधान्याचे संकट निर्माण झाले होते आणि लोक आणि अधिकारी यांच्यात अनेक भांडण झाले होते.

चीनमध्ये वुहानपासून उत्तर पश्चिम शहरात कोरोनाच्या रुग्णांत पुन्हा वाढ होत आहे. त्यामुळे तेथेही लॉकडाऊन लावण्यात आला आहे. झिरो कोविड पॉलिसीमुळे, जिथे कोरोनाची प्रकरणे समोर येत आहेत, अशा क्षेत्रांनाही सील करण्यात आले आहे. चीनमध्ये गेल्या 24 तासांत सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचे 1000 हून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनानंतर इबोलाची दहशत; युगांडात संचारबंदी, प्रार्थनास्थळांवरही निर्बंध

चीनमध्ये निर्बंध कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत आणि शांघाय Huanpu नदीतील एका बेटावर कायमस्वरूपी कोरोना केंद्र तयार करण्याच्या योजनेवर काम करत आहे, असे तेथील स्थानिक मासिक KaiChin मध्ये म्हटलं आहे. या केंद्रात 3,009 स्वतंत्र खोल्या आणि 3250 बेड असतील आणि त्याचे बांधकाम सहा महिन्यांत पूर्ण होईल, अशी माहितीही या मासिकात देण्यात आली आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -