घरताज्या घडामोडीकोरोना इफेक्ट: स्विगीच्या मागणीत ६० टक्क्यांनी घट, १००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढणार

कोरोना इफेक्ट: स्विगीच्या मागणीत ६० टक्क्यांनी घट, १००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढणार

Subscribe

एनआरएआयच्या अंदाजानुसार झोमाटो-स्विगीची डिलिव्हरी साखळी ९० टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. असा अंदाज आहे की कोरोनामुळे त्यांच्या ५ लाख सदस्यांना २०२० सालात ८० हजार कोटींचे नुकसान होऊ शकतं.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे देशातील उद्योग-धंद्यांवर याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. लॉकडाऊनमुळे कंपन्या बंद पडल्या असून कर्मचार्‍यांच्या नोकर्‍यांवर टांगती तलवार आहे. गेल्या काही दिवसांत कर्मचाऱ्यांना नोकऱ्यांवरुन काढण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत. दरम्यान, आता ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी १००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकणार असल्याची माहिती समोर येत आहेत.

इकॉनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना संकटामुळे स्विगीच्या मागणीत ६० टक्क्यांनी घट झाली आहे. अहवालानुसार स्विगी कंपनीनेही याची पुष्टी केली आहे, परंतु कंपनीने कर्मचार्‍यांची संख्या जाहीर केलेली नाही. या अहवालात असं म्हटलं आहे की, कंपनी भाडे कमी करण्यासाठी आपले अर्धे किचन बंद करणार आहे. देशातील ९० टक्के रेस्टॉरंट्स भाड्याने घेतलेल्या जागेत चालतात. अशा प्रकारचे सुमारे २० टक्के रेस्टॉरंट्स मॉल्समध्ये आहेत. याशिवाय उर्वरित शहरांच्या मुख्य भागांच्या रस्त्यांवर आहेत. या रेस्टॉरंट्सना त्यांच्या उत्पन्नाचा १५ ते ३० टक्के उत्पन्न भाडं म्हणून द्यावं लागतं. मॉलमध्ये चालू असलेल्या रेस्टॉरंट्सना अतिरिक्त ५ ते ६ टक्के देखभाल शुल्क भरावा लागतो. हा देखभाल शुल्क ३००० स्क्वेअर फूट रेस्टॉरंटसाठी अनेकदा महिन्याला अडीच लाख होतो. लुलू ग्रुप, लोढा ग्रुप, फोरम आणि वेगास यासारख्या बड्या मॉल मालकांनी काही काळासाठी भाडं माफ केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: वुहानच्या दोन डॉक्टरांचा रंग बदलला, संसर्ग झाल्यानंतर चेहरा झाला काळा


 

- Advertisement -

८० हजार कोटींचे नुकसान

नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (National Restaurant Association of India) लॉकडाऊनच्या काळात मोठं नुकसान होण्याची शक्‍यता व्यक्त केली आहे. एनआरएआयच्या अंदाजानुसार झोमाटो-स्विगीची डिलिव्हरी साखळी ९० टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. असा अंदाज आहे की कोरोनामुळे त्यांच्या ५ लाख सदस्यांना २०२० सालात ८० हजार कोटींचे नुकसान होऊ शकतं.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -