घरताज्या घडामोडीकरोना व्हायरस : तेहरानमध्ये अडकले महाराष्ट्रातील ६०० भाविक

करोना व्हायरस : तेहरानमध्ये अडकले महाराष्ट्रातील ६०० भाविक

Subscribe

चीनमध्ये धुमाकूळ घालत असलेल्या करोना व्हायरसने जगभर थैमान घातले असून आता याचा फटका महाराष्ट्रातील ६०० भाविकांना देखील बसल्याचे समोर आले आहे.

चीनमध्ये धुमाकूळ घालत असलेल्या करोना व्हायरसने जगभर थैमान घातले असून आता याचा फटका महाराष्ट्रातील ६०० भाविकांना देखील बसल्याचे समोर आले आहे. इराक आणि इराणमध्ये तीर्थयात्रेसाठी गेलेले महाराष्ट्रातील तब्बल सहाशे यात्रेकरू अडकून पडले आहेत. इराणची राजधानी तेहरानमध्ये महाराष्ट्राचे ६०० भाविक गेले होते. मात्र, ‘करोना’च्या साथीमुळे इराक आणि इराणसह तेथील अन्य देशांनी सीमा बंद केल्यामुळे या भारतीय यात्रेकरूंना गेल्या आठ दिवसांपासून तेथेच अडकून पडावे लागले आहे.

सोलापुरातील ४४ जणांचा समावेश

कोल्हापूरमधल्या साद टूर्स कंपनीने या सहलीचे आयोजन केले होते. या सहलीमध्ये महाराष्ट्रातील ६०० भाविक ३१ जानेवारी रोजी तेहेरानमध्ये पोहोचले. इराकची राजधानी बगदाद येथे प्रसिध्द सुफी संत हजरत गौस पाक जिलानींचा दर्गाह तसेच मोहम्मद पैगंबरांचे नातू हजरत इमामहुसेन आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ज्या करबलाच्या युध्दात हौतात्म्य पत्करले तेथील स्थळांचे दर्शन घेण्यासाठी हे यात्रेकरू गेले होते. मात्र, इराक आणि इराण आदी देशांनी तेथील सीमा बंद केल्यामुळे ते त्याठिकाणी अडकून पडल्याचे समोर आले आहे. ‘आम्ही गेले आठ दिवस एकाच ठिकाणी अडकून पडलो आहोत. तसेच सध्या आम्ही भीतीच्या छायेखाली वावरत असताना परमेश्वराकडे प्रार्थना करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही. आम्हाला तातडीने मायदेशी आणा’असे आवाहन या भाविकांनी सरकारला केले आहे.

- Advertisement -

इराणमध्ये भारतातील ३०० मच्छीमार

करोना व्हायरसच्या भितीमुळे तेथील विमानतळ बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे भारतातील जवळपास ३०० मच्छीमार इराणच्या बंदर – इ – चीरुयेह आणि होरोमोझगान प्रांतामध्ये अडकले आहेत. हे मच्छीमार गुजरातमधील मारोली, भातखाडी, कलगाम, दांडी, नारगोल आणि वलसाडच्या अन्य गावातील असून हे सध्या आपल्या कुटुंबाशी फोनवरुन संपर्कात असल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा – शरद पवार ठरवणार मुंबईचा सीपी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -