घरCORONA UPDATECoronaVirus: 'या' वयोगटातील लोकांना कोरोनाचा धोका कमी; WHO ने केले मान्य

CoronaVirus: ‘या’ वयोगटातील लोकांना कोरोनाचा धोका कमी; WHO ने केले मान्य

Subscribe

"कोरोना विषाणू मुलांनाही जीवे मारू शकतो, हे आपल्या सर्वांना माहित आहे, परंतु कोरोना संक्रमणाचा गंभीर परिणाम त्यांच्यावर दिसत नाही."

जगभरात कोरोनाचा कहर सुरू असून आतापर्यंत ३ कोटींहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे आणि संसर्ग होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर, जगभरात या विषाणूमुळे ९ लाख ४५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बघायला गेले तर सर्वच वयोगटातील माणसांवर कोरोनाचा परिणाम होताना दिसतोय. मात्र किशोरवयीन मुलांवर कोरोनाचा परिणाम सर्वात कमी होत असल्याचे सांगितले जात आहे. एका अहवालानुसार असे सिद्ध झाले की, २० वर्षापेक्षा कमी वयाच्या १० टक्के लोकांना या विषाणूची लागण झाली आहे आणि आतापर्यंत २० वर्षांखालील ०.२ टक्के पेक्षा कमी लोक या विषाणूमुळे मरण पावले आहेत.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, लहान मुले आणि तरुणांमध्ये कोरोना विषाणूचा धोका किती आहे, हे जाणून घेण्यासाठी अधिक संशोधन करण्याची आवश्यकता आहे. संघटनेचे महासंचालक टेड्रस अ‍ॅड्नॉम यांनी नुकतेच सांगितले की, “कोरोना विषाणू मुलांनाही जीवे मारू शकतो, हे आपल्या सर्वांना माहित आहे, परंतु कोरोना संक्रमणाचा गंभीर परिणाम त्यांच्यावर दिसत नाही.”

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेनेही हे मान्य केले आहे की, कोरोनामुळे संक्रमित आणि मृत्यू झालेल्या मुलांची आणि तरुणांची संख्या लक्षणीय कमी आहे, परंतु टेड्रस अ‍ॅडॅनॉमचे म्हणणे आहे की, या विषाणूचा लहान मुलांवर आणि किशोरवयीन मुलांवर वेगळा प्रभाव होत आहे. असे असले तरी बर्‍याच देशांमध्ये, मुलांना वेळेवर लस दिली गेली नाही, लाखो मुले शाळेत जात नाहीत, ज्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर होत आहे.

या वयोगटातील लोकांना कोरोनाचा धोका

जागतिक आरोग्य संघटना किंवा वेगवेगळ्या देशांच्या सर्व वैज्ञानिकांचा असा विश्वास आहे की, कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे, जे आधीपासूनच कोणत्या तरी रोगाने ग्रस्त आहेत, वृद्ध किंवा ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी आहे. यासह मधुमेह किंवा हृदयरोग असणाऱ्या व्यक्तीने सर्वात सावध असणे आवश्यक आहे. तर सर्व लोकांनी सावधगिरी बाळगली तरच हा प्राणघातक विषाणू टाळता येऊ शकतो.

- Advertisement -

गेल्या महिन्यात बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, इंग्लंड ते जपान आणि जर्मनी ते ऑस्ट्रेलिया या अनेक देशांमधील तरुणांना कोरोना विषाणूच्या नवीन रुग्ण वाढीसाठी दोषी ठरवले जात आहे. बरेच अधिकारी असे म्हणतात की या वयोगटातील लोक लॉकडाऊनमध्ये कंटाळले आहेत, म्हणून ते आता सोशल डिस्टन्सिंग पालन न करता घराबाहेर पडत आहेत जपानमध्ये, २० ते २९ वर्षे वयोगटातील लोकांना सर्वाधिक संक्रमण आढळले आहे. तर ऑस्ट्रेलियामध्येही अशीच परिस्थिती दिसून आली आहे.


‘या’ तारखेला मिळणार कोरोनाची लस; राज्यसभेत आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -