घरताज्या घडामोडीCorona Third Wave In India: कोणकोणत्या राज्यांमध्ये काय आहेत निर्बंध? जाणून घ्या...

Corona Third Wave In India: कोणकोणत्या राज्यांमध्ये काय आहेत निर्बंध? जाणून घ्या सविस्तर

Subscribe

देशात आतापर्यंत १६ राज्यांमध्ये शाळा-कॉलेज बंद करण्यात आली आहेत. काही राज्यांमध्ये मिनी लॉकडाऊन जरी करण्यात आला आहे.

देशात गेल्या १३ दिवसांपासून १८ टक्के कोरोना दैनंदिन रुग्णांची नोंद होत आहे. देशात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे, त्यामुळे देशात दररोज १ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. सध्या देशात ८ लाखांहून अधिक सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मात केल्याप्रमाणे तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी देशातील अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. आतापर्यंत १६ राज्यांमध्ये शाळा-कॉलेज बंद करण्यात आली आहेत. काही राज्यांमध्ये मिनी लॉकडाऊन जरी करण्यात आला आहे. त्यामुळे आज आपण कोणकोणत्या राज्यांमध्ये काय निर्बंध लावण्यात आले आहेत? याबाबत जाणून घेणार आहोत…

दिल्ली

दिल्लीत सोमवारी १९ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर कठोर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA) म्हणजे DDMAने दिल्लीच्या सर्व खासगी कार्यालय बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बार आणि रेस्टॉरंटमध्ये फक्त टेक अवेची सुविधा असणार आहे. प्रत्येक झोनमध्ये दरदिवशी कफ्त साप्ताहिक बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशमध्ये सर्व सरकारी आणि खासगी कार्यालय एका वेळेत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याचा आदेश दिला आहे. सरकार वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देत आहे. नव्या गाईडलाईन्सनुसार रात्री १० वाजल्यापासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असणार आहे. सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये फक्त ऑनलाईन वर्ग सुरू राहतील. १५ ते १८ वयोगटातील सर्व लाभार्भींना १५ जानेवारीपर्यंत कोरोना लस घेणे बंधनकारक केले आहे. काही जिल्ह्यांमध्ये स्विमिंग पूल, जिम बंद करण्याचा आदेश दिला गेला आहे. शिवाय रेस्टॉरंट, हॉटेल आणि चित्रपटगृह ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. याव्यतिरिक्त आता विधानसभा निवडणूक असल्यामुळे ट्रॅक्टर ट्रॉली, घोडा गाडी घेऊन जाण्यास परवानगी दिली नाही. धार्मिक स्थळांवर ५०हून जास्त लोकांना जमता येणार नाही. लखनऊमध्ये जिम, वॉटरपार्क बंद करण्याचा आदेश दिला गेला आहे.

महाराष्ट्र

महाराष्ट्र एक प्रकारे मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने राज्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू केली आहे. नवीन नियमांअंतर्गत आता सकाळी ५ वाजल्यापासून ते ११ वाजेपर्यंत ५ किंवा ५ पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊ शकत नाहीत. याशिवाय शाळा-कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आलाा आहे. तसेच सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमात ५० लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. लग्न समारंभासाठीही ५० लोकांना मुभा देण्यात आली असून अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना उपस्थितीत राहण्यास मुभा दिली आहे. तसेच शॉपिंग मॉल्स, चित्रपटगृह, जिम, ब्युटी पार्लर, नाट्यगृह, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील.

- Advertisement -

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमध्ये सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कार्यालयात ५० टक्के उपस्थितीत राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. लोकल ट्रेन संध्याकाळी ७ वाजल्यापासून ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय शॉपिंग मॉल्स आणि बाजाराची क्षमता ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्राणी संग्रहालयसह आकर्षित सर्व स्थळे बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. यामध्ये स्विमिंग पूर, पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर आणि जिम यांचा समावेश आहे. मुंबई आणि नवीन दिल्लीहून उड्डाणे आठवड्यातून फक्त दोन वेळा होतील. ब्रिटनच्या कोणत्याही उड्डाणाला परवानगी नाही. चित्रपटगृह, नाट्यगृह ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.


हेही वाचा – Omicron Variant: चांगली बातमी! ओमिक्रॉनविरोधात मार्चमध्ये तयार होणार लस


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -