घरट्रेंडिंगCorona Heroes: कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी 'हा' डॉक्टर राहतोय गाडीत!

Corona Heroes: कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी ‘हा’ डॉक्टर राहतोय गाडीत!

Subscribe

सध्या जगभरात कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस तसंच अत्यावश्यक सेवेतील इतर कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची आणि नागरिकांची सेवा करत आहेत. सध्या सोशल मीडियावर एका डॉक्टरबद्दल चर्चा सुरू आहे. या डॉक्टरचे घर सध्या एक गाडी झाली आहे. हा डॉक्टर आपल्या कुटुंबाचा कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी गाडीमध्येच राहत आहे. तो मूलभूत वस्तूसह गाडीमध्ये कित्येक दिवस राहत आहे.

हा डॉक्टर भोपाळच्या जेपी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून त्याचे नाव डॉ. सचिन नायक आहे. ऑल इंडिया रेडिओच्या आकाशवाणी समाचार यांनी ट्विटवर अकाऊंटवर त्यांचा फोटो शेअर केला आहे. या ट्विटची दखल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी घेतली आहे. त्यांनी देखील रिट्विट करत लिहिलं की, मी आणि संपूर्ण मध्य प्रदेश या कोविड-१९च्या विरोधात युद्ध लढणाऱ्या योद्धांना सलाम करतो. अशा संकल्पनेतून आपण सर्वजण पुढे जात राहिलो तर आणखीन लवकर आपण हे महायुद्ध जिंकू.

- Advertisement -

७ एप्रिला रोजी शेअर केलेल्या या ट्विटनंतर आतापर्यंत ६ हजारहून अधिक लाईक्स मिळाले असून १ हजारहून अधिक जणांनी रिट्विट केलं आहे. सोशल मीडियावर या डॉक्टरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ‘असे लोक आपले हिरो आहेत. त्यांनी केलेल्या कामाची आपण परतफेड काहीही करू शकत नाही’, असं एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिलं आहे.

- Advertisement -

यानंतर डॉ. सचिन नायक याने मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्याच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे.


हेही वाचा – CoronaVirus: वाघाला कोरोनाची लागण झाल्यामुळे बकऱ्यांना घातले मास्क!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -