घरCORONA UPDATE..तर भारतात ८ लाखाहून जास्त कोरोनाबाधित! - ICMR

..तर भारतात ८ लाखाहून जास्त कोरोनाबाधित! – ICMR

Subscribe

जगभरातल्या दिग्गज राष्ट्रांची कोरोनाशी दोन हात करताना दमछाक होत असताना भारतात मात्र अजूनही कोरोनाबाधितांची
संख्या तुलनेने मर्यादित आहे. यासाठी सरकार आणि प्रशासकीय पातळीवरचे प्रयत्न आणि डॉक्टर-पोलिसांची जिवावर उदार होऊन सुरू असलेली कर्तव्यतत्परता कारणीभूत आहे. मात्र, हे सगळं असलं, तरी देखील लॉकडाऊनने या सगळ्यामध्ये फार मोठी भूमिका बजावल्याचा खुलासा नुकताच आयसीएमआर अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेच्या अहवालातून समोर आला आहे. जर भारतात लॉकडाऊन नसता, तर १५ एप्रिलपर्यंत भारतात तब्बल ८ लाखांहून जास्त कोरोनाबाधित रुग्ण असते, असा दावा आयसीएमआरच्या अहवालात करण्यात आला आहे. प्रभातखबरने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. विशेष म्हणजे, या दाव्याला सांख्यिकीय आधार देखील देण्यात आला आहे.

इतर देशांची तुलना केली, तर भारतात जेव्हा कोरोनाचा एकही रुग्ण किंवा संशयित नव्हता, तेव्हापासून म्हणजेच १७ जानेवारीपासून विमानतळांवर स्क्रीनिंग सुरू झालं. पहिला रुग्ण आढळला ३० जानेवारी रोजी. पण इटलीने पहिला रुग्ण सापडल्यानंतर २५ दिवसांनी तर स्पेनने ३९ दिवसांनंतर स्क्रीनिंग सुरू केलं होतं. लॉकडाऊनच्या बाबतीत देखील भारताने तातडीने पावलं उचलत घोषणा केली. त्यामुळे देशातला कोरोनाचा फैलाव नियंत्रणात राहिल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

- Advertisement -

काय सांगते आकडेवारी?

आकडेवारीचा विचार केला तर सामान्यपणे एक कोरोनाग्रस्त व्यक्ती जर खुलेपणाने लॉकडाऊन नसलेल्या परिस्थितीत फिरत असेल, तर ती तब्बल ४०६ लोकांना संक्रमित करू शकते. पण जर लॉकडाऊन असेल, तर सरासरीने एक कोरोनाग्रस्त फक्त २.५ लोकांनाच कोरोनाची बाधा करून देऊ शकतो. या आधारावर जर गणित मांडलं, तर २४ तारखेला लॉकडाऊन जाहीर झाल्यापासूनचे १५ एप्रिलपर्यंतचे दिवस जर मोजले, तर व्यापक गुणोत्तराने हा आकडा ८ लाख २० हजारांच्या घरात जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -