Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश corona india: देशात आठवड्याभरात नव्या कोरोनाबाधितांची संख्या २२ लाखांवर, मृतांची संख्या ८९...

corona india: देशात आठवड्याभरात नव्या कोरोनाबाधितांची संख्या २२ लाखांवर, मृतांची संख्या ८९ टक्के

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना विषाणूने अक्षरश: धुमाकूश घातला आहे. यात गेल्या आठवड्याभरात भारतात कोरोना रुग्णसंख्या जगभरातील रुग्णसंख्येचे रेकॉर्ड ब्रेक करत आहे. त्यामुळे भारतासमोरील कोरोनास्थिती अधिकचं चिंताजनक बनत आहे. देशात दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येने दिवसा ३ लाखांचा आकडा पार करत आहे. यात सोमवार ३ लाख ९९२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर कोरोनामुळे मृत झालेल्या मृतांचा आकडा २८१२ वर पोहचला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्या भरात ३ लाखांचा आकडा पार करणाऱ्या भारतात परिस्थिती आरोग्य विभागाच्या नियंत्रणाबाहेर जात आहे.

देशात १८ ते २५ एप्रिलपर्यंत आठवड्याभरात कोरोना रुग्णसंख्या २२. ५ लाखांवर पोहचली आहे. संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून आठवड्यातली ही सर्वाधिक रुग्णवाढ भारतात झाली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येचा परिणाम देशातील आरोग्य व्यवस्थेवर दिसून येत आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन, बेड्स, व्हेंटिलेटर्स, इंजेक्शन अभावी कोरोना रुग्णाचा जीव जात आहे. त्यामुळे कोरोनावर योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात ( ११ एप्रिलपासून ते १८ एप्रिलपर्यंत) देशात ८ हजार ५८८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर या आठवड्यात ( १८ एप्रिलपासून ते २५ एप्रिलदरम्यान) १६ हजार २५५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या ८९ टक्क्यांनी वाढली असून दुप्पट झाली आहे. गेल्या आठवड्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णसंख्येत ४६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

या आठवड्याभरात देशात २२ लाखांहून अधिक नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत ही रुग्णवाढ सर्वाधिक आहे, दरम्यान जानेवारी महिन्यात कोरोना विषाणूचे संक्रमण पून्हा वााढत असताना अमेरिकेत पहिल्याच आठवड्यात १७.९ लाख नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. मात्र आता भारतात एका आवठड्यात वाढणाऱ्या रुग्णसंख्येने नवे रेकॉर्ड रचले आहेत.


coronavirus: कहर! देशात २४ तासांत ३ लाख ५२ हजार नवे रुग्ण, मृतांचा आकडा २८१२ पार


- Advertisement -

 

- Advertisement -