Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE Indian Double Mutant : कोरोनाविरोधी लस ठरू शकते निरूपयोगी, तज्ज्ञांचा दावा

Indian Double Mutant : कोरोनाविरोधी लस ठरू शकते निरूपयोगी, तज्ज्ञांचा दावा

Related Story

- Advertisement -

भारतातील डबल म्यूटंटमुळे जगभरातील संशोधकांची आणि अभ्यासकांची चिंता वाढली आहे. अधिक संसर्ग फैलावणारा आणि जीवघेणा असा इंडियन डबल म्यूटंटकडे संपुर्ण जगाचे लक्ष लागले आहे. त्यामुळेच अमेरिका, हॉंगकॉंग, रशिया, पाकिस्तान यासारख्या अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या नागरिकांसाठी देशात प्रवेशबंदी केली आहे. अशातच नव्याने समोर आलेले संशोधन हे जगभरात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणाची चिंता वाढवणारे आहे. इंडियन डबल म्यूटंटची दहशत आता जगभरात निर्माण झाली असून या म्यूटंटपुढे कोरोनाची लसदेखील प्रभावी ठरणार नसल्याचा दावा आता संशोधक आणि अभ्यासकांकडून केला जात आहे. अधिक संसर्ग पसरवणारा आणि जीवघेणा असा कोरोनाचा भारतीय डबल म्यूटंटचा धसका आता जगभरातून घेण्यात आला आहे.

covid-19 च्या डबल म्यूटंटच्या निमित्ताने एक नवीन माहिती समोर आली आहे. भारतातील डबल म्यूटंट आणि कोरोनाविरोधातील लस याबाबतचा हा अहवाल आहे. अभ्यासकांच्या मते कोरोनाचा अधिक संसर्ग आणि जीवघेण्या अशा भारतीय स्ट्रेनमुळे सध्या जगभरातील दिली जाणारी कोरोनाची लस निरूपयोगी ठरू शकते असा दावा अभ्यासातून समोर आला आहे. आतापर्यंत जगभरात युके, दक्षिण आफ्रिका, ब्राझीलच्या वेरीयंटचा बोलबाला होता. पण नव्याने समोर आलेला इंडियन म्यूटंट हा जगभरातील अभ्यासकांचे आणि डॉक्टरांचे लक्ष वेधून घेत आहे. सामान्यपणे संसर्गासोबत एक म्युटेशन आढळते. पण कोरोनाच्या दोन म्यूटंटने मात्र चिंता वाढवल्याचे सांसर्गिक आजाराचे विशेष डॉक्टर ओलायेमी ओसियेमी यांनी स्पष्ट केले आहे. एकट्या यूकेमध्येच १०० अधिक कोरोनाची डबल म्यूटंटची प्रकरणे समोर आली आहेत. तर कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापिठात डबल म्यूटंट स्ट्रेनची पाच प्रकरणे समोर आली आहेत.

- Advertisement -

हे नवीन प्रकारचे म्यूटंट हे कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने पसरतो आहे. तसेच अधिक काळ आजारी राहण्याचाही धोका असल्याचे मत पाम बीच रिसर्च सेंटरचे मुख्य संशोधक डेवीड स्कॉट यांनी सांगितले. भारतीय म्यूटंटच्या संपर्कात आल्यानंतर कोरोनाविरोधातील लस घेतल्यानंतर शरीरात तयार झालेल्या अॅन्टीबॉडिचा प्रभाव कमी होतानाच व्हायरस विरोधात लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यासाठी अडथळे येत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. तसेच कोरोनाविरोधात घेतलेल्या लसीचा प्रभावही या इंडियन वेरीयंटमुळे कमी होऊ शकतो, असा दावा ओसीयेमी यांनी केला आहे. शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती या म्यूटंटमुळे कमी होतानाच, स्ट्रेनचा संसर्ग अधिक वाढण्याचा तसेच मृत्यूचा धोका वाढण्याचीही शक्यता असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. म्हणूनच म्यूटेशन अधिक काळ टिकून राहतानाच व्हायरसला आणखी बळ मिळत असल्याचा संशोधकांचा अंदाज आहे.

डबल म्यूटंट पोहचला १० देशांमध्ये

डबल म्यूटंट आतापर्यंत अमेरिका, युके, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया यासारख्या दहा देशांमध्ये आढळला आहे. आऊटब्रेक इन्फोने याबाबतची माहिती जाहीर केली आहे. त्यामध्ये भारतातच २६५ प्रकरणे ही भारतातील, ७७ प्रकरणे युकेमध्ये तर स्कॉटलंडमध्येही या नव्या म्यूटंटचा शोध सुरू आहे. स्कॉटलंडने आम्ही या नव्या म्यूटंटवर अभ्यास करत आहोत असे स्पष्ट केले आहे. तर युकेने स्पष्ट केले आहे की, कोरोनाच्या भारतातल्या डबल म्यूटंटविरोधात नवीन लस प्रभावी ठरेल असे स्पष्ट केले आहे.


- Advertisement -

 

- Advertisement -