घरCORONA UPDATEसहा फुटांपेक्षा जास्त अंतरावरूनही होऊ शकते कोरोनाची लागण, अमेरिकेच्या CDCचा अहवाल

सहा फुटांपेक्षा जास्त अंतरावरूनही होऊ शकते कोरोनाची लागण, अमेरिकेच्या CDCचा अहवाल

Subscribe

सहा फुटांपेक्षा जास्त अंतरावरुनही कोरोनाची लागण

कोरोनाने जगभरात फैलाव केल्यापासून काही महत्त्वाच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात येत आहे. त्यातील महत्त्वाचे म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे. घराबाहेर पडल्यावर २ फुटांचे अंतर राखणे गरजेचे आहे. मात्र कोरोनाच्या नव्या ट्रेनमध्ये कोरोना व्हायरस हवेतून पसरत असल्याचे समोर आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोशल डिस्टन्सिंगचे अंतर २ वरुन ६ फुट करण्यात आले. अमेरिकेच्या CDCने सादर केलेल्या अहवालात त्यांनी असे म्हटले आहे की, सहा फुटांपेक्षा जास्त अंतरावरुनही कोरोनाची लागण होऊ शकते. CDCने सादर केलेल्या अहवालात असे म्हणले आहे की, जागतिक सल्ल्यानुसार, खोकल्या किंवा शिंकल्यानंतर बाहेर येणाऱ्या ड्रॉपलेस्टमधून व्हायरस पसरतो. कोरोना व्हायरस आता हवेतून पसरत असल्याने गर्दीच्या ठिकाणी बंद खोलीत एक मीटरपेक्षा जास्त प्रवास करुन शकतो. त्यामुळे श्वास घेताना हवेतील छोटे ड्रॉपलेट्स शरीरात प्रवेश करतात. कोरोनाचे संक्रमण होणाऱ्या तीन मार्गांपैकी हा पहिला मार्ग आहे,असे CDCने म्हटले आहे.

कोरोना व्हायरस संक्रमित होणाच्या सामान्य मार्ग म्हणजे दोन मीटरच्या आत उभ्या असलेल्या कोरोना संक्रमित व्यक्तीच्या शिंकण्याने किंवा खोकल्याने लहान लहान ड्रॉपलेट्स खाली पडतात. श्वासातून,नाकातून किंवा तोंड्याच्या माध्यमातून व्हायरस दुसऱ्या माणसाच्या शरीरात जातो. त्यामुळे विषाणूचे लहान लहान कण किंवा ड्रॉपलेट्स हवेतून संक्रमित होतात. त्यामुळे तीन ते सहा फुटांच्या आत असलेल्या व्यक्तीलाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त असते. कारण हवेतून व्हायरसचे बारिक बारिक कण झपाट्याने पसरले जातात.

- Advertisement -

म्हणून CDC ने असा इशारा दिला आहे की, संसर्ग झालेल्या व्यक्तीपासून सहा मीटरचे अंतर पाळले तरीही हवेच्या मार्फत विषाणूचे संक्रमण होऊ शकते. श्वास घेतना, बोलताना,गाणे गाताना, व्यायाम करताना किंवा खोकताना स्पेक्ट्रमवर थेंबाच्या स्वरुपात व्हायरस संक्रमित होतो. यासगळ्यावरुन आता कोरोना व्हायरस हवेतून संक्रमित होते याचे ठोस पुरावे तयार झाले आहेत.


हेही वाचा – देशात ऑक्टोबरमध्ये येणार कोरोनाची तिसरी लाट; IIT कानपूरच्या शास्त्रज्ञांचा दावा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -